कोल्हापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलेली 1 लाखांची दारू चोरीला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – इचलकरंजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात चोरी झाल्याचे समोर आले आहे. कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी विभागाने जप्त केलेल्या दारूवर डल्ला मारला आहे. 31 डिसेंबरदरम्यान ही दारू जप्त करण्यात आली होती असे समजत आहे. याच दारूवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही अवैध दारू जप्त केली होती. जप्त केलेली दारू कार्यालयात ठेवण्यात आली होती. कार्यालयाचं कुलूप तोडून चोरांनी दारू लंपास केली आहे. जवळपास 1 लाख 3 हजार रुपयांची ही दारू आहे. चोरी झालेल्या दारूमध्ये एकूण 509 दारूच्या बाटल्या होत्या.

या घटनेनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. विभागातील लोकांचं या जप्त केलेल्या दारूवर लक्ष नव्हता का ? विभागातीलच कोणीतरी या बाटल्या बाहेर तर पोहोचवल्या नाहीत ना अशा शंकाही व्यक्त केल्या जात आहे. ताब्यात घेतलेल्या बाटल्या कशा चोरीला जातात असा सवालही केला जात आहे ? कारण याची किंमत 1 लाखांहून अधिक आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/