Coronavirus : जगभरात 24 तासात 1 लाख नवे ‘कोरोना’बाधित तर 5 हजारांहून अधिक जणांचा मृत्यु, 12 देशात 75 % रुग्ण

वॉशिंग्टन : वृत्त संस्था  – जगभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यास अनेक देशांना अद्याप यश मिळालेले नाही. गेल्या २४ तासात जगभरात तब्बल १ लाख ७ हजार ७०६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ५ हजार २४५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जगभरात आतापर्यंत ५३ लाख ३ हजार ९९२ अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ३ लाख ४० हजार ३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्याचवेळी जगभरातील २१ लाख ५६ हजार २८८ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत.

जगभरातील २१३ देशात ५३ लाखांहून अधिक रुग्ण असले तरी त्यातील  ७५ टक्के कोरोनाचा लागण ही केवळ १२ देशातील लोकांना झाली आहे. या १२ देशात तब्बल ४० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरातील देशांपैकी अमेरिकेत एकूण एक तृतीयांश कोरोना बाधित रुग्ण असून येथे मृत्युही तितकेच आहेत. जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना दक्षिण अमेरिकेत या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाचा फैलाव कमी होता. पण गेल्या काही दिवसात त्यात मोठी वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये गेल्या काही दिवसात दररोज १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे ब्राझीलने रशियाला बाजूला सारुन अमेरिकेपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर गेला आहे.

जगभरातील प्रमुख देशांमधील कोरोना बाधित आणि मृत्यु
अमेरिका – १६४५०८४ (९७६४०)
ब्राझील – ३३०८९० (२१०४८)
रशिया – २८१९०४ (३२४९)
इंग्लड – २५४१९५ (३६३९३)
इटली – २२८६५८ (३२६१६)
फ्रॉन्स – १८२२१९ (२८२८९)
जर्मनी – १७९७१३ (८३५२)
टर्की – १५४५०० (४२७६)
इराण – १३१६५२ (७३००)
भारत १२४७९४ (३७२६)
पेरु – १११६९८ (३२४४
चीन – ८२९७१ (४६३४)

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like