केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख पदे रिक्त !

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 1 लाख जागा रिक्त आहेत. त्यामध्ये राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यूमुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे, असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले आहे.

सीमा सुरक्षा दलात 28926, केंद्रीय राखीव पोलीस दलात 26506, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 23906, सशस्त्र सीमा दलात 18643, इंडो-तिबेट पोलीस दलात 5784, आसाम रायफल्समध्ये 7328 जागा रिकाम्या आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवृत्ती, मृत्यू, राजीनाम्यामुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे. काही दलांमध्ये नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यातील बहुतांश रिक्त पदे कॉन्स्टेबल स्वरूपाची असून या जागा भरण्यासाठी थेट भरती, बढती, प्रतिनियुक्ती या पद्धती वापरल्या जातात. सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्रयांनी राज्यसभेत सांगितले आहे.