‘हे’ खातेदार PMC बँकेतून काढू शकतात 1 लाख रूपये, फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेच्या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक जण यामुळे त्रस्त झाले असून नुकतेच बँकेने ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा 40,000 रुपये केल्यानंतर आता काही प्रकरणामध्ये आरबीआयने 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे.

या व्यक्तींसाठी वाढवली रक्कम
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ग्राहक 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. त्याचबरोबर जेष्ठ नागरिक, शिक्षणासाठी आणि अपंग व्यक्तींसाठी हि रक्कम 50,000  रुपये आहे. मात्र 1 लाख रुपयांची रक्कम हि  40,000  हजाराच्या वेगळी नसून यामध्येच त्या रकमेचा समावेश करण्यात येणार आहे. याआधी पैसे काढण्यास मर्यादा असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे तर काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

पैसे काढताना द्यावी लागणार माहिती
व्यक्तीच्या घरातील रुग्णांसाठी हि रक्कम काढायची असल्यास यासाठी डॉक्टरची चिट्टी किंवा पत्र द्यावे लागणार असून मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट आणि मेडिकल बिल तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर बँक तुम्हाला हि रक्कम देणार आहे. त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांना 50 हजार रुपये काढण्यासाठी वयाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. तर दिव्यांगांना देखील प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. तर लग्नासाठी रक्कम हवी असल्यास लग्नपत्रिका, कार्यालयाचे बुकिंग, सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या यांसारख्या गोष्टी दाखवाव्या लागणार आहेत.

Visit  :Policenama.com