१ मे पासुन बँक, रेल्वे आणि इतर २ क्षेत्रात होणार ‘हे’ महत्वपुर्ण बदल !

पोलीसनामा न्यूज नेटवर्क : नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरु होऊन जवळपास १ महिना पूर्ण होत आला आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी झाली. त्याचप्रमाणे काही नवीन नियम मे महिन्यापासून लागू होणार आहेत. बँकिंग, हवाई, मोबाईल आणि रेल्वे या क्षेत्रांमध्ये हे महत्वपूर्ण बदल विशेषकरून लागू होतील.

१) बँकिंग क्षेत्रात होणारे बदल –

i ) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी काय बदल होईल –

मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या अनेक सेवांमध्ये बदल करत आहे. १ मेपासून SBI बँकेच्या ठेवी आणि कर्ज व्याज दर RBI च्या बेंचमार्क दराशी जोडले जातील. त्याचा आरबीआयच्या रेपो दर बदलणे, बँकेच्या ठेवी आणि कर्ज दरावर परिणाम होईल. मात्र हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. हा नियम केवळ १ लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी आणि कर्ज व्याजदरांवर लागू होईल.

ii ) पंजाब नॅशनल बॅंकेच्या (PNB) ग्राहकांसाठी काय बदल होईल –

जर तुम्ही पंजाब नॅशनल बॅंकेने ग्राहक असाल आणि डिजिटल वॉलेट (PNB Kitty) वापरत असाल तर १ मे ला तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या ग्राहकांना डिजिटल वॉलेट मधील रक्कम ३० एप्रिलपर्यंत खर्च करण्यास सांगितली आहे किंवा त्वरित निधी हस्तांतरण सेवेद्वारे (IMPS) आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी संगितली आहे.
थोडक्यात १ मे पासून पीएनबीच्या ग्राहकांना (PNB Kitty) ऐवजी दुसरे पर्याय किंवा डिजिटल वॉलेट वापरणे आवश्यक आहे. जर ग्राहकांनी आपल्या डिजिटल वॉलेटमधून पैसे काढले नाही तर अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

२) रेल्वे प्रवाशांसाठी काय बदल होईल –

भारतामध्ये सर्वाधिक प्रवास हा रेल्वेनं केला जातो. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना १ मे पासून विशेष सुविधा मिळणार आहे. ट्रेन प्रवासाचं आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडलं आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. मात्र अशी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करण्याचा कालावधी २४ तासांवरून ४ तासांवर आणला आहे. ट्रेनचा चार्ट लागण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे.

३) हवाई क्षेत्रामध्ये होतील हे बदल –

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर स्पाइसजेट, गोएअर आणि इंडिगो यांनी वेगळ्या मार्गांवर विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. मे महिन्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांवर विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय १ मे रोजी जेट एअरवेजच्या प्रवाशांच्या तिकिट रिफंड करण्यासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.

४) मोबाइल युजरसाठी काय बदलेल –

मे महिन्यात आपण आधारकार्डशिवाय सिम कार्ड खरेदी करू शकता. आधारकार्ड हे डिजिटल आयडी प्रुफ म्हणून वापरले जाते. नवीन सिमकार्ड घेण्यासाठी विनाआधारवाली डिजिटल केवाईसी सिस्टम तयार करण्यात आली आहे. सध्या या सिस्टमची चाचणी चालू आहे. या प्रणालीद्वारे नवीन सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेरिफिकेशन करून १ ते २ तासांमध्येच सक्रिय करून दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा नियम लागू झाला आहे.

Loading...
You might also like