Coronavirus : चिंताजनक ! पुणे अन् पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे नवीन 21 रूग्ण, राज्याची संख्या 690 पार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. आज (रविवारी) दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यात 17 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 4 कोरोना व्हायरसचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. पुण्यात 24 तासात तिघांचा तर औरंगाबादमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे आणखी 55 नवे रूग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 690 वर जाऊन पोहचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरव्दारे दिली आहे.

कोरोना व्हायरसमुळं पुण्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाटल्यानं वाढत आहे. राज्यातील ग्रामीण परिसरामध्य देखील कोरोनानं शिरकाव केला आहे. काल (शनिवारी) लातूर जिल्हयात कोरोनाचे 8 रूग्ण आढळून आले होते तर उस्मानाबादमध्ये देखील रूग्णांची संख्या 3 वर गेली आहे. रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 55 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये मुंबई-29, पुणे-17, पिंपरी-चिंचवड-4, अहमदनगर-3, औरंगाबादमधील 2 रूग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 690 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 56 जण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.