राज्यातील ‘या’ 4 मोठ्या शहरांमध्ये मुद्रांक शुल्कात 1 एप्रिलपासून 1 % सवलत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-1949 व मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988 मधील तरतूदींमध्ये सुधारणा करून कलम 149(अ) व कलम 144(ई) नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. सदर तरतुदीनुसार महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या मनपा क्षेत्रात स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री, दान व फलोपभोग गहाण या संबंधीच्या संलेखांवर मुद्रांक शुल्क अधिनियकान्वये आकारावयाच्या मुद्रांत शुक्लात एक टक्का दराने अधिभार आकरून वाढ करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

सदर तरतुदीनुसार अतिरिक्त मुद्रांक शुल्क ज्या दिनांकापासून वा नंतर आकारले जाईल त्यासाठी दि. 8 फेब्रुवारी 2019 विनिर्दिष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली असून आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीच्या वेळी भराव्या लागणार्‍या एकंदरीत मुद्रांक शुल्क आणि इतर निगडीत भारामध्ये 1 एप्रिल 2020 पासून पुढील 2 वर्षाच्या कालावधीकरिता 1 टक्के सवलत देण्यात येत आहे. याबाबतची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 पासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना स्वतंत्ररित्या काढण्यात येणार आहे.