नव्या महिन्यात नवीन नियम, जाणून घ्या सप्टेंबरमध्ये तुमच्या खिशावर काय होईल परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नवीन महिना म्हणजे सप्टेंबरची सुरुवात झाली आहे. या महिन्यात तुमच्या खर्चावर परिणाम होणार आहे कारण अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. या तर अधिक विस्तृतपणे जाणून घेऊ..

देशातील दुसरी सर्वात मोठी असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने लोन साठी असणाऱ्या रेपो रेटचा व्याजदर 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे, आता हा दर 6.80 टक्के झाला आहे.

नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. गृह, शिक्षण, वाहन, सूक्ष्म आणि लघू उदयोग यांना दिले जाणारे नवे लोन आरएलएलआरशी संबंधित आहेत.

या महिन्यात विमान सेवा महाग होईल. नागरी उड्डाण मंत्रालयाने 1 सप्टेंबर पासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा विमान सेवा शुल्क वाढवला आहे. एएसएफ शुल्क आत्तापर्यंत 150 रुपये आकारला जात होता पण आता तो 160 रुपये इतका असेल.

ऑगस्ट नंतर आता सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम गॅस सब्सिडाईज्ड एलपीजी सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर आहे. अन्य शहरांमध्येही एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

सरकारने कंपोजिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या डीलर साठी आर्थिक वर्ष 2019-20 मधील जीएसटी भरण्याचा कालावधी पुन्हा वाढवला आहे. हा कालावधी 2 महिने वाढवून आता तो 31 ऑक्टोबर 2010 पर्यंत करण्यात आला आहे. मागील काही महिन्यात हा कालावधी दोन वेळा वाढवण्यात आला आहे. जीएसटी अंतर्गत कोणताही करदाता ज्याची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत आहे तो कंपोजिशन योजनेचा भाग बनू शकतो.

कॅब, ओला आणि उबेर चालक दिल्लीत त्यांच्या काही मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. कोरोना काळात झालेल्या नुकसानी नंतर त्यांनी भाडं वाढवण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो बंद आहेत त्यामुळे लोकांना आंदोलनासाठी येण्यास अडचण निर्माण होऊ शकते.