कामाची गोष्ट ! 1 सप्टेंबर पासून लागू होणार ट्रॅफिक, टॅक्स, बँक आणि तंबाखूनजन्य पदार्थांसाठी ‘हे’ नवे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून वाहतूक, कर, तंबाखू आणि बँकिंग या क्षेत्रात मोठे बदल होणार असून त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. या अंतर्गत तुम्ही कमी व्याज दरावर घर विकत घेऊ शकता तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा अधिक दंड द्यावा लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून सर्व बँका देशातील शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (केकेसी) देण्यास प्रारंभ करणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने देशातील प्रमुख बँकांना 15 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

या क्षेत्रात बदलले नियम

1) बँकिंग नियमात बदल

1 सप्टेंबरपासून बँकिंग नियम पूर्णपणे बदलतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑटो आणि गृह कर्जे थेट रेपो दराशी जोडली आहेत. जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो दर बदलते तेव्हा त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होतो. एसबीआय व्यतिरिक्त देशातील अन्य बँकाही रेपो रेटशी जोडतील, त्यानंतर बँकेच्या वेळेत बदल दिसून येईल. दुसरीकडे, लोकांना एका तासाच्या आत घर, वाहन आणि वैयक्तिक कर्ज मिळेल.

2) ट्रॅफिक नियम-

1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा अधिक दंड द्यावा लागणार आहे. दारू पिऊन वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणे यासह अन्य बाबींवर दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे.

3) टॅक्सच्या नियमांत बदल –

सरकारने करविषयक धोरणासंदर्भात एक नवीन योजना आणली असून ती 1 सप्टेंबरपासून अंमलात येईल. उर्वरित कर देखील या योजनेत भरला जाईल. यासह, कर भरल्यास व्याज सूट दिली जाईल आणि लोकांना कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार नाही. जर एखादी व्यक्ती आयकर विवरण भरत नसेल तर त्याला दंड भरावा लागू शकतो.

4) तंबाखूच्या पॅकेटवर चेतावणी बदलली जाईल-

सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तंबाखूच्या पॅकेटवरील चेतावणीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. यासाठी 2008 मध्ये पारित केलेला कायदा बदलला आहे. नव्या नियमानुसार आता तंबाखूच्या पॅकेटवर एक नंबर छापला जाईल, ज्यावर कॉल करून लोकांना व्यसन सोडण्याचे उपाय सांगितले जातील.

5) वाहन विम्यात बदल होईल-

1 सप्टेंबरपासून विमा कंपन्या आपल्या ग्राहकांना नैसर्गिक आपत्ती आणि वाहनांवरील दंगली यांसारख्या घटनांपासून वाचवण्यासाठी स्वतंत्र विमा संरक्षण देतील. त्यामुळे लोकांना भूकंप, पूर यांसारख्या घटनांपासून दिलासा मिळणार आहे. आता या व्यतिरिक्त, सरकारने सर्व विमा कंपन्यांना पुढील महिन्यापासून जुनी वाहने आणि दुचाकीच्या मालकांना स्वतंत्र विमा देण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –