दिव्यांग मतदारांसाठी 1 हजार 797व्हीलचेअर ; मतदान केंद्रावर विशेष व्यवस्था

जिल्हयात 13 हजार 448 दिव्यांग मतदार

अहमदनगर : पोलिसनामा आँनलाईन – दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर पोहचण्‍यासाठी वाहतुक व्‍यवस्‍था, मतदनीस, विशेष मतदनीस, ब्रेल लिपीची आवश्‍यकता असलेल्‍या मतदारांना आवश्‍यक सुविधा पुरविण्‍यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी एकूण 1797 व्हीलचेअरची व्यवथा करण्यात आली आहे. सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 13 हजार 448 एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले,मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने 12 विधानसभा मतदार संघात कार्यरत मतदान केंद्रावर 1 हजार 797 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदाराच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित माहिती उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या शाळांमधून प्रशिक्षित कर्मचा-यांना मतदान केंद्रावर मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येणार आहे. सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दिव्‍यांग मतदार जिल्‍हयातील सुविधांची स्थिती

दिव्‍यांग मतदारांची एकूण संख्‍या-13 हजार 448

व्हिलचेअरची आवश्‍यकता असलेले मतदार-1 हजार 797

वाहतुक सुविधा आवश्‍यक असलेल्‍या मतदारांची संख्‍या-1 हजार 701

मतदनीस,सहायकाची आवश्‍यकता असलेल्‍या मतदारांची संख्‍या – 2 हजार 527

विशेष मतदनीस, सहायकाची आवश्‍यकता असलेले मतदार- 1 हजार 314

ब्रेल लिपीची आवश्‍यकता असलेल्‍या मतदार- 1 हजार 523

Loading...
You might also like