एक हजार मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या सात महिन्यात नगर शहरात एक हजार वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आले आहेत. संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मद्यपी वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी राबवण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीनुसार अपघाताचे प्रमाण दहा टक्कांनी कमी
करण्यासाठी उपाय योजना राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. शहरात रस्ते
अपघातांचे प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्या अनुषंगाने अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरीता
अहमदनगर पोलीस दलाकडुन प्रयत्न चालू आहेत.

सन २०१९ मध्ये आतापर्यंन्त कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व शहर वाहतुक
नियंत्रण शाखा अहमदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करत
अहमदनगर शहरात ठिकठिकाणी अचानक नाकाबंदी करुन वाहन चालविणारे इसमांनी मद्यप्राशन केले
आहे काय, याबाबत ब्रेथ अॅनालाझर उपकरणाव्दारे तपासणी करुन १००० मद्यपींवर मोटर वाहन
अधिनियम १९८८ कलम १८५ प्रमाणे कारवाई करुन कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन
गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

मोटर वाहन अधिनियम १९८८ कलम १८५ प्रमाणे करण्यात आलेल्या कारवाई मध्ये मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येते. यामध्ये मा.न्यायालय आरोपीस सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंन्त असु शकेल इतक्या द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा सुनावितात. जिल्हा पोलीस विभागाकडुन आवाहन करण्यात येते की, मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये. त्यामुळे वाहन चालकाच्या तसेच अन्य व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालवितांना वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. यापुढेही अहमदनगर शहरात वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर प्रभावी व कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली शहराचे पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ, हारुण मुलाणी, अविनाश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –