Video : १ वर्षाच्या मुलीची स्विमिंग पाहून तुम्ही व्हाल थक्क, व्हिडिओ व्हायरल

POLICENAMA ONLINE TEAM – असे म्हणतात की, लहान मुलांच्या डोक्यावर देवाचा हात असतो. याचे उदाहरण आपण पाहू शकता. नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क १ वर्षाची मुलगी जबरदस्त स्विमिंग करत आहे. ते ही कोणाचीही मदत न घेता. लोकांना हे पाहून आश्चर्य वाटत आहे. व्हिडिओमध्ये ही मुलगी पाण्याच्या आत बॅक-स्ट्रोक, फ्रंट क्रॉल आणि स्पिन करताना दिसत आहे. एका लहान बाळाला स्विमिंग करताना पाहून लोकांना खुप आश्चर्य वाटत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरिडा ची Grace Fanelli हीला आपल्या मुलांना लहानपणापासून स्विमिंग शिकवायची होती. Fanelli ला दोन मुली आहेत. एक मुलगी ३ वर्षाची आहे. आणि दुसरी १ वर्षाची आहे. दोन्ही मुलींना तिने ९ महिन्यांपासूनच स्विमिंग शिकवले आहे. व्हिडिओमध्ये Fanelli ची छोटी मुलगी स्विमिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये १ वर्षाची मुलगी १ मिनीटे स्विमिंग करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून नक्कीच थक्क व्हाल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like