अमेरिकेत आणखी एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या

न्यूर्याक : वेंटनोर शहरात एका १६ वर्षाच्या मुलाने ६१ वर्षाच्या भारतीय नागरिकाला गोळ्या घालून त्यांची हत्या केली. गेल्या काही महिन्यात भारतीयांची हत्या करण्याची ही तिसरी घटना आहे.
सुनिल एडला असे त्यांचे नाव आहे. ही घटना अमेरिकन वेळेनुसार गुरुवारी रात्री घडली. सुनिल एडला हे मुळचे भारतातील तेलंगणा येथील रहिवासी होते. गेल्या ३० वर्षांपासून ते अटलांटिक काऊंटीमध्ये राहत होते. तसेच तेथील अटलांटिक सिटीमध्ये नोकरीला होते.
सुनील एडला या महिन्यात आपल्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात येणार होते. संशयित आरोपीला अटक करण्यात आल्याचे अटलांटिक काऊंटीचे प्रोसीक्यूटर डी. जी. टायनर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांवर हल्ले होत असून या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे. तेलंगणातील ३२ वर्षाचे अभियंता श्रीनिवास कुचिभोटला यांची २३ फेब्रुवारीला गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तर १० फेब्रुवारीला तेलंगणातीलच वामिशी रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती.

मोबाईलच्या स्फोटाने २गाड्यांचा अपघात
कोल्हापूर : मोटारीतमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून त्यात दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील बोरगावजवळ घडला आहे. या भीषण अपघतात १ महिला गंभीर जखमी आहे तर दोघांना दुखापत झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

स्विफ्ट गाडीमध्ये मोबाईल स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर कारचा अपघात झाला आहे. मोबाईलचा स्फोटानंतर चालकाचा गाडीवर ताबा सुटला आणि त्यातून कारची दुचाकीला धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे जबर नुकसान झाले आहे. तर रुग्णांना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलगा कधीच निवडणूक हरला नाही, तर बाप कधीच जिंकला नाही