Jio नं ‘फ्री कॉलिंग’ बंद केल्यानंतर 10000 वापरकर्त्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंटरकनेक्ट यू एजेंसी चार्ज म्हणजेच आययूसीवरून टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या वादामध्ये आता ग्राहकांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांवर मोठा ताण पडत ऑन यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नुकतेच इतर कंपन्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करताना प्रतिमिनिट 6 पैसे चार्ज लागणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ग्राहक देखील आपल्या कंपनीच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी ट्रायच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.

10 हजार जिओ वापरकर्त्यांनी दाखल केली याचिका
जिओच्या ग्राहकांनी ट्रायच्या या नियमांविरोधात याचिका दाखल केली आहे. यासाठी जवळपास 10 हजार ग्राहकांनी आपले समर्थन दिले असून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ट्राय 2011 पासून हे शुल्क बंद करण्याचा विचार करत आहे . मात्र आता 31 डिसेंबर 2019 हि शेवटची तारीख जवळ येताच पुन्हा एकदा यावरून वाद सुरु झाला आहे.

काय आहे आययूसी चार्ज
आययूसी चार्ज म्हणजे इंटर कनेक्शन यूजेज़ चार्ज म्हणजे दोन टेलिकॉम कंपन्या फोन दरम्यान जे शुल्क घेतात त्याला आययूसी चार्ज म्हटले जाते. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर IUC चार्ज लागू होतो. त्यामुळे आता यापुढे तुम्ही जिओ वरून दुसऱ्या कंपनीच्या क्रमांकावर फोन केल्यास तुम्हाला 6 पैसे प्रतिमिनिट चार्ज द्यावा लागणार आहे.

कंपन्यांना होत आहे नुकसान
ट्रायच्या या नियमामुळे कंपन्यांना मोठा तोटा होत असून याचा सर्वात जास्त तोटा हा जीओला होत आहे. अन्य कंपन्यांचे ग्राहक हे जिओच्या ग्राहकांना मिस कॉल देतात. त्यामुळे त्यांनी परत फोन केल्यास जीओला या फोनसाठी प्रतिमिनिट 6 पैसे शुल्क द्यावे लागत आहे. त्यामानाने दुसऱ्या कंपन्यांचे चार्जेस खूप जास्त आहेत आणि म्हणूनच त्यांचे कॉल दर खूप महाग आहेत. यामुळेच दुसऱ्या कंपनीचे ग्राहक यावर मिस कॉल देतात. दर महिन्याला जिओ वर 25 – 30 कोटी मिस कॉल येतात. त्यानंतर जिओ धारक जेव्हा कॉल करतो तेव्हा IUC चार्ज लागतो. अशा कॉलवर जिओ ग्राहकाला 6पैसे/मिनट भरावे लागतात.

 

Visit : Policenama.com