जाणून घ्या खोबरेल तेलाचे ‘हे’ 10 आरोग्यदायी फायदे ! सौंदर्य खुलवण्यासाठी ‘असा’ करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खोबरेल तेल तुमचा चेहरा आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून सौंदर्य कसं खुलवलं जाऊ शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत.

1) खोबरेल तेलानं रोज डोळ्यांखाली मसाज केली तर सुरकुत्या पडत नाहीत. काळी वर्तुळही निघून जातात.

2) खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्यनं अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

3) खोबरेल तेलात कोअर्स शुगर मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला नैसर्गिक स्क्रबर म्हणून लावू शकता. यामुळं चेहऱ्याची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

4) मेकअप रिमुव्हर – खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमुव्हर आहे. केमिकलयुक्त रिमुव्हर वापरण्यापेक्षा याचा वापर करणं कधीही फायदेशीर आहे.

5) खोबरेल तेलामुळं चेहरा उजळतो. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचा फेसपॅक तयार करावा. यामुळं चेहरा उजळण्यास मदत होते.

6) खोबरेल तेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी चांगलं असतं. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलानं मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.

7) खोबरेल तेलानं जखमेवरील दाह कमी होतो. चटका लागला किंवा भाजलेल्या ठिकाणी खोबरेल तेल लावावं. यामुळं दाह कमी होतो.

8) चेहऱ्यावर पुरळ येत असतील तर खोबरेल तेलाचा वापर करू शकता. याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

9) आठवड्यातून एकदा जर खोबरेल तेलानं केसांची मसाज केली तर केसगळतीचं प्रमाण कमी होतं आणि कोंड्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

10) जर अंगावर लाल चट्टे किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करावा. यामुळं आराम मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.