Makar Sankranti 2021 : तीळ खाण्याचे ‘हे’ 10 फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मकर सक्रांतीचा सण (Makar Sankranti) काही दिवसांवर आला आहे. थंडीत येणाऱ्या या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचं विशेष महत्त्व आहे. थंड वातावरणापासून शरीराचं संरक्षण व्हावं यासाठी तिळगुळ खाल्ले जातात. तीळा हा आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. थंडीत शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा त्रास होतो त्यांनी थंडीत आवश्य तिळाचं सेवन करावं.

1) अनेकांना हिवाळ्यात थंडी सहन होत नाही. अशा वेळी अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावं. यामुळं शरीरातील उष्णता टिकून राहते.

2) अनेकांची त्वचा कोरडी असते अशांनी आहारात तिळाचा समावेश करा. यामुळं त्वचेचा पोत सुधारतो. थंडीच्या सुरुवातीपासून जर तीळाचं सेवन केलं तर त्वचा कोरडी पडण्याचं प्रमाण कमी होतं.

3) ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा उष्णतेचे विकार आहेत त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावा. थंडीव्यतिरीक्त एरवीही त्वचा कोरडी पडत असेल तिळाचं सेवन करावं.

4) तीळ पचण्यास जड असतो. त्यामुळं भाकरीला तीळ लावून त्याचं सेवन करावं.

5) तीळाच्या कुटाचा भाजीतदेखील वापर केला जातो. अनेक ठिकाणी दाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तीळाचा कुट वापरला जातो.

6) मासिक पाळीत ज्या महिलांना रक्तस्त्राव कमी होतो त्यांनी तीळाची चटणी खावी.

7) बाळंत स्त्रीला पुरेसं दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे यामुळं पुरेसं दूध येण्यास उपयोग होतो.

8) ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनाही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मुत्राशय मोकळं होण्यास मदत होते.

9) दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो.

10) केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.

टीप –   वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.