‘हे’ 10 ‘स्टार किड्स’ अभिनयापासून दूरच, बनवली स्वत:ची वेगळी ओळख !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहे. इतकंच नाही तर अनेक लोकांनी स्टार्सला आणि त्यांच्या किड्सलाही नेपोटीजमच्या नावाखाली टारगेट केलंय. सुशांत आऊटसाईडर्स असल्यानं अनेकांनी त्याला नाकारलं असंही बोललं जात आहे. अशात आता आपण हे जाणून घेणार आहोत की, असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी फिल्मी बॅकग्राऊंड असूनही अॅक्टींगव्यतिरीक्त दुसऱ्या क्षेत्रात करिअर केलं आहे. अशा एकूण 10 स्टार किड्सबद्दल माहिती घेऊयात.

1) शाहीन भट – डायरेक्टर महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी शाहीन भट हिनं पडद्यामागील कामाची जाबाबदारी घेतली आहे. सन ऑफ सरदार सिनेमासाठी तिनं रायटरचं काम केलं आहे. शाहीन एक लेखक आहे. शाहीननं लंडनमध्ये फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे.

View this post on Instagram

Siblings 💙

A post shared by Shaheen Bhatt (@shaheenb) on

2) रिद्धीमा कपूर साहनी – ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर साहनी फॅशन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. ती लाईमलाईटमध्ये जास्त नसली तरीही जास्त चर्चेत असते.

View this post on Instagram

Just us ❤️ #twinningwithmommy❤ #strongertogether

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

3) मसाबा गुप्ता – विवियन रिचर्ड्स आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता ही फेमस फॅशन डिझायनर आहे. आपल्या वक्तव्यांमुळंही ती अनेकदा चर्चेत रहात असते.

4) अंशुला कपूर – बोनी कपूरची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर ही गुगल एम्प्लॉईड राहिली आहे. नंतर तिनं हृतिक रोशनच्या HRX ब्रँड कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केलं.

View this post on Instagram

Wild hair, don’t care 🙌🏽

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor) on

5) श्वेता नंदा – अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लेक श्वेता नंदा हिनं लॉरियलसाठी मॉडेलिंग केली आहे. नेक्स्ट जेन टॉक शोही होस्ट केला आहे. परंतु सिनेमांपासून ती दूर आहे. श्वेता नंदा स्वत:चा क्लोदींग ब्रँड चालवते.

6) रिया कपूर – अनिल कपूरची मुलगी आणि सोनम कपूरची बहिण रिया कपूर एक फॅशन स्टायलिस्ट तर आहेच सोबतच ती फिल्म प्रोड्युसर आहे. रिया सोनमची स्टायलिस्ट आहे.

7) राहुल भट – आलिया पूजा आणि शाहीन यांच्या व्यतिरीक्त महेश भट यांचा एक मोठा मुलगा आहे याच नाव राहुल भट आहे. राहुल एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. दंगल सिनेमासाठी त्यानं आमिर खानला ट्रेनिंग दिली आहे.

8) सबा अली खान – सैफ अली खान आणि सोहा अली खान यांना एक बहिण आहे जिचं नाव सबा अली खान आहे. सबा सिनेमांपासून दूर असते. ती एक प्रसिद्ध जुलरी डिझायनर आहे.

9) सुनैना रोशन – राकेश रोशनची मुलगी आणि हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशन अनेकदा चर्चेत आली आहे. याच कारण तर अनेद वादच राहिलं आहे. सुनैनानं तिच्या कुटुंबाचं प्रॉडक्शन हाऊस फिल्मक्राफ्ट सक्सेसफुली पुढे नेलं आहे.

View this post on Instagram

The story of us… @hrithikroshan BLOG LINK IN BIO 🙂

A post shared by Sunaina Roshan (@zindagibysunainaroshan) on

10) अहाना देओल – धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक अहाना देओल अॅक्टींगमध्ये नसूनही खूप फेमस आहे. ती प्रोफेशनल ओडीसी डान्सर आहे.