Winter Food : सर्दी-खोकला-ताप करेल परेशान, बचावासाठी ‘या’ 10 गोष्टींचं आवश्य सेवन करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – तापमान कमी होताच लोकांना खोकला-सर्दीची समस्या उद्भवू लागते. यातून आराम मिळावा म्हणून आपण पाण्यासारखे पैसे खर्च करतो. न्यूयॉर्कमधील प्रमाणित न्यूट्रिशनिस्ट एंड रजिस्टर्ड डायटिशियन लिसा याराह यांनी १० रोग प्रतिकारशक्ती बूस्टर पदार्थांबद्दल सांगितले आहे, जे या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेतील जाणून घेऊ..

१) लाल शिमला मिरची_व्हिटॅमिन इम्युनिटी वाढविण्यासाठी खूप प्रभावी आहे. लिंबूवर्गीय फळांपेक्षा लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी दुप्पट असते. दररोज पाच वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला २०० ग्रॅम व्हिटॅमिन-सी मिळते.

२) बडीशेप- बडीममध्ये सुमारे २० टक्के व्हिटॅमिन सी असते. त्याचे दररोज सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करणाऱ्या पांढर्‍या रक्त पेशी निर्माण करते. बडीशेप शरीरातील अनेक रोगांपासून दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

३) दही – दहीमध्ये असलेले प्रोबियोटिक घटक शरीराला दूषित होण्यापासून वाचवते आणि संसर्गातून त्वरित बरे होण्यास मदत करते. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स हे निरोगी बॅक्टेरिया आहेत जे पचन प्रणालीदेखील नियंत्रित राखतात.

४) ग्रीन टी – ग्रीन टी वेगाने वजन कमी करण्यात प्रभावी आहे तसेच त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, ग्रीन टी आपल्याला ऑक्सिडंट्स आणि रॅडिकल्सपासून संरक्षण देते.

५) गोड बटाटा – हिवाळ्यात गोड बटाटा खाण्याचेही बरेच फायदे आहेत. अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट्स समृद्ध कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरातील पेशींचे कार्य सुधारित करतात.

६) लसूण- लसूण हे भाजीची चव वाढवण्यासाठी ओळखले जाते. खोकला आणि सर्दीपासून बचाव करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. लसणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि सल्फरिक असते जे जीवाणूपासून मुक्त होण्यास मदत करतात.

७) हळद- सर्व भाज्यांमध्ये वापरली जाणारी हळद शरीरातील फ्री रॅडिकल्सपासून होणारे नुकसान रोखते. हळदीचे सेवन संक्रमणाशी लढण्यासाठी आणि जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

८) साल्मन फिश – साल्मन फिश एक सुपरफूड आहे. हे प्रथिने उच्च स्राेत म्हणून ओळखले जाते. ओमेगा -३ फॅटी ॲसिडने समृद्ध साल्मन फिश आरोग्यासाठी आवश्यक आहेत. शरीरातील टी-सेल्स जितके जास्त असतील तितके आजारी पडण्याची शक्यता कमी होईल.

९) ऑयस्टर्स -ऑयस्टर्स एक उत्तम खाद्य आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बरेच अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स असतात जे आपल्या पेशींची काळजी घेतात.

१०) ब्रसेल्स स्प्राउट- ब्रसल्स स्प्राउट हा शरीरात फारच कमी कॅलरीयुक्त पोषण देते, तर शरीरातील खराब झालेल्या पेशीही ठीक करते. व्हिटॅमिन-सीच्या आवश्यकतेसाठी आपण दररोज अर्धा कप ब्रुसेल्स स्प्राउट्स खाल्ले पाहिजेत.