त्वचेच्या सर्व समस्या दूर करून सौंदर्य वाढवण्यासाठी 10 ‘हर्बल’ ब्युटी टीप्स ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण नॅचरल ग्लो आणि त्वचेसाठी इतर सौंदर्यवर्धक मिळवण्यासाठी 10 हर्बल ब्युटी टीप्स जाणून घेणार आहोत.

1) कच्च्या दुधात खोबरेल तेल एकत्र करून कॉटनच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. 2-3 मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवून टाका. यामुळं स्कीन हायड्रेट आणि सॉफ्ट राहते.

2) काकडीच्या रसात मीठ एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब करा. 2-3 मिनिटे मसाज केल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या. यामुळं डेड स्किन सेल्स निघून जातात आणि ग्लो वाढतो. चेहरा डल वाटत असेल तर हा उपाय नक्की करा.

3) गव्हाच्या पिठामध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब घाला. यात गुलाब पाणी टाका. याची पेस्ट तयार झाल्यानंतर आता चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर थोडं पाणी लावून हातांनीच स्क्रब आणि मसाज करा आणि पेस्ट चेहऱ्यावरून काढा. नंतर चेहरा धुवून घ्या. यामुळं स्किन तर सॉफ्ट होतेच, शिवाय फेशिअल हेअर्सपासूनही सुटका मिळते.

4) लिंबाच्या रसात हळद एकत्र करून चेहऱ्याला लावावी. यामुळं पिंपल्स आणि डाग दूर होतात. लिंबामुळं स्किन लाईट होते. हळदीत असणाऱ्या इंफ्लामेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेफ्टीक गुणांचाही त्वचेला खूप फायदा होतो.

5) टोमॅटो किसून त्यात गुळ आणि गुलाब पाणी एकत्र करा. हे स्क्रब स्किनसाठीखूप फायदेशीर ठरतं. या स्क्रबनं 3-4 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. यामुळं स्कीन टोन लाईट होतो आणि नॅचरल ग्लो मिळतो.

6) चंदनाच्या पावडरमध्ये मध आणि गुलाब पाणी एकत्र करून फेस पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

7) डाळींबाच्या ज्यूसमध्ये काकडीचा रस मिक्स करा. कॉटनच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण मानेच्या काळेपणासाठीही वापरू शकता. हे मिश्रण लावल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी तसंच ठेवा नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका.

8) टोमॅटोच्या रसामध्ये ग्लिसरीन आणि चंदन पावडर मिक्स करा. हे मिश्रण कॉटनच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवून नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

9) मुलतानी मातीत कोरफडीचा गर एकत्र करून लावलं तर पिंपल्स डाग, टॅनिंग,आणि ड्राय स्किनपासून सुटका मिळते. स्किन ग्लो करते. यामुळं त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

टोमॅटो जर तुमची स्किन जास्त ऑईली असेल तर ग्रीन टीमध्ये कोरफडीचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. फायदा मिळेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांचा ॲलर्जीही असते.