10 Home Remedies For Dengue Patients | डेंग्यूच्या तापावर घरगुती उपाय : तापासाठी औषधा इतक्या प्रभावी आहेत या 10 गोष्टी, वाढते प्लेटलेट्स काऊंट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 10 Home Remedies For Dengue Patients | पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी डेंग्यूचा रुग्ण असेल तर उपचारासाठी काही घरगुती उपायही करून पाहू शकता. मात्र, प्लेटलेट्सची संख्या खुपच कमी असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. डेंग्यूच्या रुग्णांनी कोणते उपाचार करावेत (10 Home Remedies For Dengue Patients) ते जाणून घेवूयात…

 

1) संत्रे (Oranges)
संत्र्यामध्ये आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. जे एक महत्वाचे अँटीऑक्सिडेंट आहे. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे अपचन होत नाही. डेंग्यूपासून त्वरीत आराम मिळवायचा असेल तर संत्रे खा.

 

2) पपई (Papaya)
पपईमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. संशोधनात आढळले आहे की, पपईच्या बिया एडीस डासांसाठी विषारी असतात. संशोधनात आढळून आले आहे की, पपईमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या वेगाने वाढते. डेंग्यूपासून आराम मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा रस काढून रोज दोनदा घ्यावा.

 

3) तेलकट अन्न टाळा (Oily food)
डेंग्यूच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे पोटाची समस्या. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे चालू ठेवू नका, अन्यथा स्थिती आणखी बिघडू शकते.

 

4) खिचडी (Khichdi)
फायबर आणि पोषक तत्व खिचडीत असल्याने रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. पचनासाठी सापे आहे. डेंग्यूचा त्रास होत असेल तेव्हा खिचडी खा.

5) हर्बल टी (Herbal Tea)
हर्बल चहा डेंग्यू तापाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतो. वेलची, पुदीना किंवा आल्याचा फ्लेवर घ्या. आल्यामध्ये दाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे डेंग्यू ताप कमी करण्यास मदत करतात. हर्बल चहा डेंग्यूवर उपचार करण्यास मदत करतो. (10 Home Remedies For Dengue Patients)

 

6) नारळाचे पाणी (Coconut water)
डेंग्यूमुळे अनेकदा डिहायड्रेशन होते. डेंग्यूच्या रुग्णांसाठी नारळाचे पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यात आवश्यक खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असल्याने शरीरातील द्रव पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. नारळ पाणी डेंग्यूच्या रुग्णांनी प्यावे.

 

7) व्हेजिटबल ज्यूस (Vegetable juice)
ताज्या भाज्यांचा ज्यूस घेतल्याने डेंग्यूची लक्षणे कमी होऊ शकतात. यातील जीवनसत्वे आणि खनिजे रोग प्रतिकारशक्ती वाढवताता.

 

8) सूप (Soup)
डेंग्यूची लक्षणे कमी करण्यासाठी सूप उत्तम आहे. हे भूक वाढण्यास आणि सांधेदुखी दूर करण्यास मदत करते.

 

9) फळांचा ज्यूस (Fruit juice)
व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादन वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यासाठी संत्रा, अननस, स्ट्रॉबेरी, पेरू आणि किवी सारखी फळे व्हायरल इन्फेक्शनशी लढणार्‍या लिम्फोसाइट्सच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात.

10) कडुलिंबाची पाने (Neem Leaves)
कडुलिंबाची पाने डेंग्यू व्हायरस टाइप -2 प्रतिकृतीची वाढ आणि संसर्ग कमी करण्यात मदत करतात.

डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा सर्वात महत्वाचा नैसर्गिक उपाय आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- 10 Home Remedies For Dengue Patients | dengue fever home remedies 10 best and effective home remedies to treat dengue fever and increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे