मायग्रेनबाबतच्या ‘या’ 10 गोष्टी, नक्की जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मायग्रेनचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल… डोकेदुखीचा एक असा प्रकार, ज्यामुळे डोक्याच्या एका भागात खुप वेदना होतात, आणि एका ठराविक कालावधीपर्यंत या वेदना वाढत जातात. तणावाच्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना मायग्रेनचा त्रास होतो, मायग्रेनबाबत या 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात…

1) पुरूषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा धोका तीनपट जास्त असतो. मायग्रेन एक प्रकारचा अनुवंशिक आजार आहे.

2) मायग्रेनची वेदना प्रत्येकाला वेगवेगळ्या कालावधीसाठी होऊ शकतो. या वेदना काही वेळासाठी ते काही दिवसापर्यंत सतत होऊ शकतात. मायग्रेनच्या वेदना कधी कमी तर कधी खुप जास्त असतात.

3) मायग्रेन आपल्यासोबत अन्य आजारांनाही घेऊन येतो, जसे की, जीव घाबरणे, उलटी येणे, खुप गरमी असल्याचे वाटणे. हा आजार तुमच्या इंद्रियांमध्ये अति संवेदनशिलता निर्माण करतो.

4) मायग्रेनचा अटॅक सर्वात जास्त 20 ते 40 वर्षाच्या वयात होतो, आणि त्याचा प्रभाव 72 तासांपर्यंत राहू शकतो. हा तुमच्या शरीराला शिथिल करतो, तसेच बेशुद्धही करू शकतो.

5) मायग्रेनचा अटॅक महिनाभरात अनेकदा येऊ शकतो. कधी-कधी हा अटॅक दोन ते तीन महिन्यातून एकदाही येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.

6) मायग्रेन तुमच्या आरोग्यासह स्वभावावर परिणाम करतो. यामुळे व्यक्ती चिडचिडी होते. शरीरात थकवा निर्माण होतो.

7) महिलांमध्ये मासिक पाळीच्या सुरूवातीनंतर चाळीस वर्षाच्या वयापर्यंत मायग्रेनच्या अटॅकची शक्यता असते.

8) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार-मायग्रेन जगातील सर्वात जास्त अपंग बनवणारा आजार आहे. हा व्यक्तीला काही काळासाठी अपंग बनवतो.

9) हार्मोनमधील बदल हे मायग्रेनचे कारण असू शकते. नेहमी महिलांमध्ये मायग्रेनचे हेच कारण दिसून येते. मासिक पाळीच्या काही काळानंतर आणि नंतर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

10) दिनचर्येत सुधारणा करून मायग्रेनला बरे करता येते. परंतु त्याचे बरे होणे एवढेसुद्धा सोपे नाही, यासाठी सुरूवातीपासून सतर्कता आवश्यक आहे.