Aadhaar PAN लिंकसह ‘ही’ 10 सरकारी कामे घ्या 31 मार्चपर्यंत आटोपून नाहीतर होईल मोठा दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2021-22 हे आर्थिक वर्ष येत्या 1 एप्रिल, 2021 पासून सुरु होत आहे. त्यानुसार विविध सरकारी कामे आटोपून घेण्यासाठी 31 मार्च, 2021 ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत ही कामे केली नाहीतर तुम्हाला मोठा दंड होणार आहे. तर जाणून घेऊया कोणती आहेत ती कामे…

– पीएम किसान सम्मान निधीमध्ये रजिस्ट्रेशनसाठी 31 मार्च ही शेवटी तारीख आहे. जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही 31 मार्चपूर्वी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.

– प्रधानमंत्री आवास योजनेमुळे (PMAY) लोकांना स्वस्तात घर उपलब्ध करून देण्याची भारत सरकारची ही योजना आहे. या योजनेचा फायदा 31 मार्चपर्यंत घेता येणार आहे. या योजनेंतर्गत घर खरेदी करताना 2.67 लाखांपर्यंत सवलत मिळते.

– कोरोनामुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सरकारी कर्मचारी LTC चा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे सरकारने LTC कॅश वाउचर स्कीम लाँच केली आहे. या योजनेंतर्गत 12 ऑक्टोबर, 2020 ते 31 मार्च, 2021 पर्यंत कोणतेही सामान किंवा सर्व्हिस खरेदी केल्यावरही लोकांना LTC मध्ये क्लेम करता येऊ शकते.

– जर तुम्ही इन्कम टॅक्सच्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी कोणतीही पॉलिसी खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला पॉलिसी 31 मार्चपूर्वी खरेदी करावी लागणार आहे. इन्कम टॅक्स कलम 80 C आणि 80 D याअंतर्गत गुंतवणुकीवर सूट मिळू शकते.

– 2019-20 या वर्षासाठी संशोधित इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी शेवटीची तारीखही 31 मार्च आहे. कोणत्याही आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्यासाठी मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न फाईल करण्याचा नियम आहे. बिलेटेड रिटर्नसाठी 10 हजार रुपये लेट फीसह 1 एप्रिलपूर्वी जमा करावी लागणार आहे.

– आर्थिक वर्ष 2019-20 साठी वार्षिक जीएसटी रिटर्न फाईल करण्याची मुदत 31 मार्च, 2021 पर्यंत वाढवली होती. जर तुम्ही शेवटच्या तारखेला रिटर्न भरत असाल तर तुम्हाला 200 रुपये दंड भरावा लागणार आहे.

– इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने प्रत्यक्ष कर विवाद समाधान योजना ‘विवाद से विश्वास’च्या अंतर्गत माहिती देण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. त्याच्या पेमेंटची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. या योजनेचा मुख्य उद्देश प्रलंबित वाद सोडवणे हा आहे.

– सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाला फायदा पोहोचवण्यासाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम या योजनेंतर्गत 31 मार्चपर्यंत कर्ज घेता येऊ शकते. सरकारने त्यासाठी 3 लाख कोटींचा फंड ठेवला आहे.

– पॅनकार्डला आधारशी लिंक करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च आहे. जर तुम्ही या महिन्यात पॅन आधारशी जोडले नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

– स्पेशल फेस्टिव्ह एडव्हान्स स्कीमअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये व्याज फ्री ॲडव्हान्स म्हणून दिला जात आहे. त्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे.