राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ! जड वाहनांवरील पथककरात 10 % वाढ

पोलिसनामा ऑनलाइन – सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंकित असलेल्या नाक्यावर पथककरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला. हा निर्णय गुरुवारी (ता. १९) घेण्यात आला. ही वाढ केवळ जाड वाहनांसाठी आहे. सध्या बांधकाम विभागाच्या फेरीतील पंधरा प्रकल्पांतर्गत वाहनांना पथककरातून सूट सूट दिली जाते. परिणामी, शासनाला दरवर्षी सुमारे ४०० कोटी रुपयांची भरपाई कंत्राटदारास द्यावी लागते. ही नुकसानभरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच, पथकर वसुलीसाठी वाहनांचे प्रकारही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, भरपाईपोटी सरकारच्या तिजोरीवर येणारा भार कमी होणार आहे. पथककरत १० टक्के वाढ करताना वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकारांच्या तुलनेत कमीच असल्याचे शासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.

आजतागायत …

१) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स वाहनचालक वगळून असलेली सहा आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम वाहने
२) मिनी बस किंवा तत्सम वाहने
३) दोन आसनांचे ट्रक, बस
४) तीन आसनांची अवजड वाहने, असे चार प्रकार होते. आता ट्रक ट्रेलर तीनपेक्षा अधिक आसनांची वाहने हा पाचवा प्रकार नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे .

सवलत योजना खास थकबाकी वसुलीसाठी

– राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख नवीन कृषीपंप जोडण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तीन वर्षात टप्प्याटप्प्याने कृषिपंपांना दिवसा कायमस्वरूपी आठ ते आठ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसंच, शेतकऱ्यांकडे असलेली कृषिपंपाची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी देणारी योजना ही मंत्रिमंडळाने मंजूर केली.

– सध्याच्या कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्यात येतील. पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी १,५०० कोटी या प्रमाणे २०२४ पर्यंत भाग भांडवल महावितरण कंपनीस देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात कायमस्वरूपी आठ तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनाअंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत.