नोकरीचं अमिष दाखवून जोडप्यानं केली १० लाखाची फसवणूक

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइन – हिंदुस्थान कॉर्पोरेशन लि. मध्ये साईट ऑफिसर म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका दाम्पत्याने दोन भावंडांची १० लाख ४४ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभय यादव आणि रिचा यादव, अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०१३ ते २६ नोव्हेंबर २०१८ च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. गिट्टीखदान हद्दीत आकारनगर नागपूर येथे राहणारे फिर्यादी युवराज शाम साखरे (३०) व त्यांचा भाऊ गौरव साखरे हे दोघेही नोकरीच्या शोधात आणि प्रयत्नात होते. ही संधी साधून आरोपी अभय यादव व रिचा यादव यांनी त्यांचा विश्वास संपादन करून हिंदुस्थान कॉर्पोरेशन लि.मध्ये साईट ऑफिसर म्हणून नोकरी लावण्याचे अमिष दाखवले होते.
जिल्हा परिषदेत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : धरणगाव तालुक्यातील पथराड येथील एका तरुणाने मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला. पथराड ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांमध्ये घोटाळा झाला आहे. ग्रामपंचायतीने अनेक बेकायदेशीर ठराव केले आहेत. यासंदर्भात तक्रारी करूनही ग्रामसेवक व बीडीओ कारवाई करीत नसल्यामुळे मिथुन पितांबर साळुंखे या तरूणाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची माहिती होताच संजय मस्कर यांनी दालनाबाहेर बाहेर धाव घेतली. त्यांनी तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले. पथराड ग्रामपंचायतीच्या संदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी ग्रामपंचायत विभागाला दिले. तसेच विस्तार अधिकारी एस.पी. पाटील यांच्यासह २ अधिकाऱ्यांचे पथक ग्रामपंचायतीची चौकशी करून दप्तर ताब्यात घेईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

धक्कादायक ! १९ वर्षीय प्रेयसीचा गळा वायरने आवळून खून करुन प्रियकराची आत्महत्या