डॉक्टरला मागितली 10 लाखांची खंडणी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. श्रीरामपुर शहरातील या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. संजय शंकर अनारसे (व्यवसाय, डॉक्टर, रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुरनं. 874/2019 आयपीसी 384, 385, 389 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उर्मिला रमेश गायकवाड या महिलेस दि. 21 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी डॉ. अनारसे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या पोटात गोळा असल्याने त्यांच्यावर 24 ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात तिची तब्येत बिघडल्याने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र तेथेही सुधारणा न झाल्याने या महिलेस नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे फरक न पडल्याने परत श्रीरामपुरात आणले. दि. 27 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेंशटचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आपल्या हॉस्पिटलची बदनामी न होण्यासाठी वरील तिनही आरोपींनी डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर जिवे ठार मारुन तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्यामुळे याबाबत डॉ. अनारसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद केल्याने वरील तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय उजे करत आहेत.

Visit : policenama.com