सत्तापेच ! हरियाणात ‘घोडं’ गंगेत ‘न्हालं, महाराष्ट्रात ‘घोंगडं’ भिजतच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे महाराष्ट्रात सत्तास्थापनेला मुहूर्त मिळत नाही तर दुसरीकडे हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी 10 नवनिर्वाचित मंत्र्यांनी शपथ घेतली असून यामध्ये भाजपच्या 8 तर एका अपक्ष आणि एका जेजेपीच्या मंत्र्याने शपथ घेतली.

महाराष्ट्र्रात शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणावामुळे सरकार स्थापन होण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहाय्याने सरकार स्थापनेचा प्रयत्न करत असून सर्व महाराष्ट्राचे याकडे लक्ष लागून आहे.

हरियाणा सरकारच्या शपथ घेतलेल्या या दहा मंत्र्यांमध्ये कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रंजीत सिंह, बनवारी लाल आणि जेपी दलाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर आधीच्या सरकारमधील अनिल वीज यांनी देखील शपथ घेतली. या कॅबिनेट मंत्र्यांसह ओम प्रकाश यादव, कमलेश ढांडा, माजी हॉकी खेळाडू संदीप सिंह आणि अनुप धानक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी जेजेपीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर आज त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील लवकरच सत्तास्थापना होण्याची आशा असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांसोबत चर्चा करत असून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like