तिहेरी तलाक विधेयकामधील १० महत्त्वाच्या तरतुदी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील मुस्लिम समाजात तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे मुस्लिम महिलांवर अन्यायच होता. तात्काळ तिहेरी तलाक म्हणजे कोठेही कधीही तीन वेळा तलाक म्हटलं की त्यांच्या लग्नाच्या नात्याचा काडीमोड होत होता. त्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया होत नव्हती. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे यावर निर्णय घेणे अधिक गरजेचे होते. तब्बल ७२ वर्षानंतरही देशातील तात्काळ तिहेरी तलाकची परंपरा मोडली जात नव्हती. त्यावर मात्र काल राज्यसभेत निर्णय झाला आहे.

देशात काल तात्काळ तिहेरी तलाकच्या विरोधातील विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. त्यावर काल निर्णय झाला. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सहीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. त्यानंतर तात्काळ तिहेरी तलाक देशाच्या हद्दपार करणारा भारत एकविसावा देश ठरला आहे. यापूर्वी इजिप्त, सुदान, श्रीलंका, इराक, सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरोक्को, कतार, संयुक्त अरब अमिरात, बांग्लादेश या देशांसह पाकिस्तानमध्येही तिहेरी तलाकवर बंदी आहे.

राज्यसभेत मंजूर झाले असले तरी त्याचे कायद्यात रुपांतर होण्यास काही कालावधी आहे. त्यामुळे त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. विधेयकानुसार तात्काळ तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीवर पोलीस त्वरीत कारवाई करू शकतात. मात्र त्यासाठी पीडित महिलेने स्वतः पोलीसात तक्रार केली पाहिजे. महिलेला जमले नाहीतर तिच्या रक्ताच्या नात्यातील म्हणजे आई-वडिल, सख्खे भाऊ-बहिण यांनी तक्रार नोंदवली तरत पोलीसांना यावर कारवाई करता येणार आहे.

विधेयकातील तरतुदींनुसार तोंडी, लेखी, व्हॉट्सअॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर पीडित महिलेने यावर तिची बाजू मांडल्यानंतर त्याव्यक्तीला जामीन देता येऊ शकतो. तर महिलेने सांगितले तर मॅजिस्टेटकडून हे प्रकरण समजुतीने सोडवता येऊ शकते. तसंच यापूर्वी तिहेरी तलाकमध्ये महिलेला कोणत्याही प्रकारची पोटगी दिली नव्हती जात, मात्र आता महिला पोटगी मागू शकते. तसंच पोटगीची रक्कम न्यायाधीश ठरवतील. तसंच यात महिलेची मुले अज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे द्याची हेही न्यायाधीश ठरवणार आहेत.

दरम्यान, राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुस्लिम महिलांना दिलासा मिळाला आहे. तिहेरी तलाकच्या माध्यामातून त्यांच्यावर होणारा अन्याय बंद होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय