काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार, बाळासाहेब थोरातांनी दिली सविस्तर माहिती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता. परंतु आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा संपली असून अखेर मुहूर्त ठरला आहे. उद्या सोमवारी, ३० डिसेंबर रोजी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास ३६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजले आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आहे. या भेटीत काँग्रेसच्या मंत्र्यांची अंतिम यादी तयार करण्यात आल्याचे समजत आहे. या यादीनुसार काँग्रेसचे एकूण १२ मंत्री असून त्यापैकी १० कॅबिनेट मंत्री असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराची जय्यत तयारी चालू झाली असून उद्या कोण शपथ घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडीकडून संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. ती यादी अशी आहे.

महाविकास आघाडीतील संभाव्य मंत्र्यांची नावे :-

शिवसेना :

तळ कोकण – दीपक केसरकर
कोकण – भास्कर जाधव/ उदय सामंत
मुंबई – रवींद्र वायकर/ सुनील राऊत
मालेगाव – दादा भुसे
जळगाव – गुलाबराव पाटील
सिल्लोड – अब्दुल सत्तार
बुलडाणा – संजय रायमूलकर
औरंगाबाद – प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट
परभणी – राहुल पाटील
सातारा – शंभूराज देसाई
सांगली – अनिल बाबर
पालघर – श्रीनिवास वनगा
उस्मानाबाद – तानाजी सावंत
यवतमाळ – संजय राठोड
नागपूर – आशिष जयस्वाल
कोल्हापूर – प्रकाश अबीटकर
अमरावती – बच्चू कडू (प्रहार)
मुंबई – अनिल परब
औरंगाबाद – संजय शिरसाठ
तसेच नीलम गोऱ्हे यांची नावे चर्चेत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस :

बारामती – अजित पवार
मुंबई – नवाब मलिक
बीड – धनंजय मुंडे
जळगाव – अनिल गोटे
विदर्भ – धर्मराव बाबा आत्राम
नागपूर – अनिल देशमुख
यवतमाळ – इंद्रनिल नाईक
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – संग्राम जगताप
जालना – राजेश टोपे
कोल्हापूर / अलिबाग – राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप)
याव्यतिरिक्त खालील काही संभाव्य नेत्यांची देखील वर्णी लागू शकते, त्यात प्रामुख्याने दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, दिलीप बनकर, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, भरत भालके, रोहित पवार, दत्ता भरणे, संजयमामा शिंदे (विधानसभा उपाध्यक्ष : भारत भालके किंवा राजेश टोपे) यांचा समावेश आहे.


काँग्रेस :

मराठवाडा – अशोक चव्हाण
लातूर – अमित देशमुख
सोलापूर – प्रणिती शिंदे
सांगली – विश्वजीत कदम
उत्तर महाराष्ट्र – के सी पाडवी
विदर्भ – यशोमती ठाकूर
मालेगाव – अमित झनक
मुंबई – अमीन पटेल
कोल्हापूर – सतेज पाटील
मुंबई – जोगेंद्र कवाडे (मित्रपक्ष)
याव्यतिरिक्त विजय वडेट्टीवार, संग्राम थोपटे, असलम शेख, (सुनील केदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी अनिश्चितता) यांची देखील वर्णी लागू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/