‘या’ 10 सोप्या उपायांनी दूर करा सतत नखे तुटण्याची समस्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्यशीही आहे. सुंदर नखे जसे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्याहून अधिक ते उत्तम आरोग्याचे निदर्शक मानले जाते. म्हणून कुणाला कुठला आजरा झाला आहे किंवा लक्षणे आहेत, याचा अंदाज त्या व्यक्तींची नखे पाहून लावला जातो. मात्र, नखांची काळजी घेण्याकडे सर्व जण दुर्लक्ष करतात. त्यामुळे नखे तुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ही नखे तुटू नयेत म्हणून आज आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत.

१. आहारात योग्य पोषक तत्वांची पदार्थ न खाल्यामुळे नखे तुटू शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी जसे पोषक तत्वांची गरज असते, तशीच गरज नखांना सुद्धा असते. आहारात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असायला हवी. तसेच आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे सुद्धा नखे तुटू शकतात.

२. तुमची नखे लवकर तुटत असतील तर तुम्ही खोबरेल तेलाने अथवा ऑलिव्ह ऑईलने नखांची मसाज करावी.

३. जर तुमची नखे लवकर तुटत असतील आणि जास्त नाजूक असतील, तर व्हिटॅमिन बी, खासकरुन बी ५ आणि फ्लॅक्सीडं ऑईलचा वापर करा.

४. जर नखे निर्जीव झाली झाली असतील तर दुधाचं सेवन करा. दुधाने हाडे आणि नखे मजबूत होतात.

५. रात्री झोपण्याआधी अँटी-फंगल नेल ड्रॉप लावा. त्याने फंगल इन्फेक्शनपासून बचाव होईल. म्हणजे नखे सुरक्षित राहतील.

६. नोकरदार शूज, सॅंडल घालणे टाळावे कारण त्याने पायाच्या अंगठ्यावर जोर पडतो आणि तेथील नख योग्यप्रकारे वाढू शकत नाही.

७. मेनिक्योर आणि पेडीक्यर करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्टरलाइज्ड आहेत की नाही हे चेक करा. शक्य असले तर पार्लरमध्ये तुमची इन्स्ट्रूमेट किट घेऊन जा.

८. काही दिवसांसाठी नखांना नेलं पॉलिश लावू नका. त्याने नखांवर पिवळे डाग पडू शकतात. एसीटोन फ्री नेलं पॉलिश रिमूव्हरचा वापर करा. नेल पॉलिश काढल्यानंतर हातांना मॉइश्चरायजर क्रीम लावा.

९. थंड वातावरणाचा पाण्यावर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी गरम पाण्याने हात धुणे शक्य होत नाही. सातत्याने थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने नखांना नुकसान पोहचू शकते. आठवड्यातून एकदा नखांना गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे त्यांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. मग नंतर त्यावरती खोबरेल तेलं अथवा इतर कोणतेही ऑइल लावा.

१०. नखांचं थंड पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी हातात ग्लव्सचा वापर करा. रबर ग्लव्स अगदी सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध होतात. त्यांचा वापर करुन भांडी अथवा कपडे धुवा. त्यामुळे नखांचं पाणी आणि साबणापासून रक्षण होईल.