पुण्यात दीड महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे १० बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोक वर काढले आहे. या रोगाच्या विषाणूंसाठी सध्याचे वातावरण पोषक असल्याने मागील पंधरा दिवसांत आणखी सात जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर मागील दीड महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे दहा जणांचा बळी गेला आहे. अजूनही ३१ पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

[amazon_link asins=’B019J3RJ1Q,B07FZN3CRD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4982e930-b96d-11e8-af59-dd0cb78e27b4′]

जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. ऑगस्टमध्ये सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान यांमुळे सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनविकारात वाढ झाली. त्याचे परिणाम सप्टेंबरमध्ये दिसू लागले आहेत. गेल्या महिन्यात तीन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. पालिकेच्या मृत्यू संशोधन समितीने हे तिन्ही मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या १५ दिवसांमध्ये संशयित पेशंटपैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील १७५ पेशंटना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यातील ८५ पेशंटवर उपचार सुरू आहेत. तर उपचारानंतर ६३ पेशंटना घरी पाठविण्यात आले आहे.

भाजपला हवेत मतदारांच्या वाहनांचे क्रमांक, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सूचना

याबाबत सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले की, बदलत्या हवामानामुळे स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या वाढत आहे. व्हेंटिलेटरवरील आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी असलेल्या पेशंटच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या पंधरा दिवसांत सात पेशंटचा मृत्यू झाला  आहे. गेल्या दीड महिन्यांत १० जणांचा बळी गेला आहे.