अरे देवा ! ‘हॅकिंग’साठी ‘या’ 10 ‘स्मार्ट’फोन्सचा होतोय ‘वापर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकालच्या या युगात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वाढले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने जीवन समृद्ध बनवले आहे. मात्र हे सर्व तंत्रज्ञान हॅक देखील होऊ शकते. स्मार्टफोन देखील आजकाल मोठ्या प्रमाणात हॅक होताना दिसून येत आहेत. विविध अँड्रॉइड स्मार्टफोनदेखील हॅक होत असून या फोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हेरगिरी सुरु असल्याचे समोर आले आहे.

ब्लूटूथ आणि यूएसबीचा वापर करुन हे मोबाईल फोन हॅक केले जाऊ शकतात. अँड्रॉईडमध्ये AT कमांडचा वापर करून हे फोन हॅक केले जाऊ शकतात. हे फोन हॅक करून फोन कॉल रोखणे, तसेच फोन दुसऱ्या क्रमांकावर फिरवणे यांसारख्या घटना हॅकर्स करू शकतात. तसेच संपूर्ण फोन हॅक करून डेटा देखील चोरण्याचं काम हॅकर्स करत असतात. 10 अँड्रॉइड फोन जे हॅक होऊ शकतात त्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये Google Pixel 2, Samsung Galaxy S3, LG G3, LG Nexus 5, Motorola Nexus 6, Samsung Note 2, Samsung Galaxy S8+, Huawei P8 Lite, आणि HTC Desire 10 Lifestyle या दहा फोनची नावे समोर आली असून हे फोन हॅक करण्यास सोपे असून एकाच बेसबँड प्रोसेसर असल्यामुळे हे हॅक करण्यास सोपे असल्याचे समोर आले आहे.त्याचबरोबर केवळ टायपिंगचा आवाज ऐकून देखील हॅकर्स पासवर्ड टाईप करू शकत असल्याचे देखील समोर आले आहे.साऊंडवेव्सच्या मदतीने या गोष्टी केल्या जात असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या फोनची चाचणी केल्यानंतर या फोनमध्ये हि चूक असल्याचे समोर आले आहे. यासाठी एक प्रयोग करण्यात आला होता. यामध्ये 45 लोकांना व्हायरस असलेले स्मार्टफोन देण्यात आले होते.

Visit : Policenama.com