home page top 1

‘त्या’ विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक अडचण ; महापालिकेकडे तोडगा काढण्याची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेचे रेल्वे स्टेशन रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या २६ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचा व शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर सह्या कोणी करायच्या, याचा तिढा निर्माण झाला आहे. सेवेतून कमी केल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिल्याने नापास झालेल्या १६ जणांना व पास झालेल्या १० जणांना पुढील शैक्षणिक अडचणी येणार आहेत. यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली आहे.

मनपाच्या या एकमेव माध्यमिक विद्यालयाला शासनाच्या शिक्षण विभागाची विना अनुदान तत्वावर मान्यता असल्याने या शाळेत ८वी ते १०चे तब्बल शंभरवर विद्यार्थी शिकतात. पण येथे काम करणारे मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे मनपा आकृतीबंधात नसल्याने त्यांच्या सेवा खंडीत केल्या गेल्या आहेत. शालेय कागदपत्रांवर सह्या करण्यास ही त्यांना मनाई केली आहे व येथील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांतून समायोजनाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सुनील काळे, दत्ता गाडळकर, विशाल खैरे, चंद्रकांत पाटोळे, सुधाकर डांगळे आदींनी महापौर वाकळे यांची भेट घेवून निवेदन दिले.

विद्यालय पुन्हा सुरू करा

महापालिकेचे डॉ. आंबेडकर माध्यमिक विद्यालय यंदापासून बंद केले गेले आहे व या शाळेतील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे अन्य शाळांतून समायोजन केले जाणार असले. तरी शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. महापालिकेने तांत्रिक अडचणी सोडवून हे विद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

Loading...
You might also like