नगरचा १० वी चा निकाल ७९.५० टक्के ; मुलींचा टक्का वाढला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७९.५० टक्के लागला आहे. मुलींचे पास होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा नऊ टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षीही मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

मुलांचे पास होण्याचे प्रमाण ७४.६७ टक्के आहे, तर मुलींची टक्केवारी ८५.६८ टक्के आहे. नगर जिल्हा पुणे विभागात तिसऱ्या स्थानी आहे. दहावीचा निकाल नेमका कधी लागणार आहे, यावरून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. त्याबाबत काही अफवा नाही येत होत्या. काल अधिकृतपणे आज निकाल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी खुला झाला. नगर जिल्ह्यातून एकूण विद्यार्थ्यांच्या ७९.५० टक्के विद्यार्थी पास झाले.

मागच्या वर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालाची घसरण झाली आहे. राज्यातील एकूण निकालापेक्षा नगरचा निकाल दोन टक्क्यांनी जास्त आहे. तसेच मुलींच्या तुलनेत मुलांचा निकाल खूपच घसरला आहे.