…त्यासाठी ‘बॉर्डर’वर बोलावले १० हजार सैनिक

पुलवामा : वृत्तसंस्था – पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. तसेच पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर अद्याप कारवाया सुरु आहेत. भारतीय सैनिकांकडून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. काश्मीरमध्ये काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुका होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १०० तुकड्या पाठविण्यात आल्या असून १० हजार जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलिही युद्धजन्य परिस्थिती नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देशातील नागरिकांना केले आहे.

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील २७ पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बॉर्डरवर निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून १० हजार सैनिकांचा ताफा सीमारेषेवर तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी भारतीय सैनिकांची पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सीमा रेषेवर बुधवारी आणि गुरुवारी गोळाबार झाल्यानंतर या ठिकाणची गावे खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच या गावातील स्थलांतरीतांना आवश्यक ते सामान सोबत घेण्यास सांगितले असून शाळा आणि सरकारी भवनांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या काश्मीरमधील काही भागांत निवडणुका होत आहेत. त्यासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक काश्मीरच्या सीमाभागात मागविण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच देशातील सर्वच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्यपाल मलिक यांनी केले आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

You might also like