10 Visa Free Countries For Indians | सुट्टीमध्ये परदेशात जाण्याची इच्छा आहे का? या 10 देशांमध्ये जाण्यासाठी लागत नाही Visa, नोट करून घ्या नावे

नवी दिल्ली : 10 Visa Free Countries For Indians | उन्हाळ्याची सुट्टी संपण्यासाठी अजूनही काही दिवस बाकी आहेत. या सुट्टीत कुटुंब, मित्र परिवारासोबत परदेशात जायचे असेल, आणि तुमच्याकडे वीजा नसेल तरी बिनधास्त रहा. कारण १० असे सुंदर देश आहेत जिथे विना वीजा तुम्ही जाऊ शकता. या देशांची यादी जाणून घेऊया.(10 Visa Free Countries For Indians)

या देशांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी भारतीय नागरिक विना वीजा राहू शकतात. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर वीजा असणे आवश्यक आहे.

१. भूतान
भारताचा शेजारी देश भूतानमध्ये तुम्ही विना वीजा जाऊ शकता. येथे १४ दिवस विना वीजा राहण्याची परवानगी असते.

२. मॉरीशस
हिंद महासागराने वेढलेल्या या देशात भारतीय पासपोर्ट धारक ९० दिवसांपर्यंत विना वीजा राहू शकतात.

३. श्रीलंका
३१ मे २०२४ ला श्रीलंकाने भारतीयांसाठी वीजा फ्री स्टेची सुरुवात केली होती. येथे ३० दिवसांपर्यंत वीजाची आवश्यकता नाही.

४. नेपाळ
भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये भारतीय पासपोर्ट होल्डर्सला वीजाची गरज नसते.

५. थायलंड
हा देश बेटांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय पासपोर्ट असेल तर येथे २ महिन्यांपर्यंत विना वीजा राहू शकता.

६. केनिया
याच वर्षी १ जानेवारीला केनियाने भारतीयांसाठी वीजा वीजा फ्री एंट्री सुरु केली होती. येथे भारतीय नागरिक ९० दिवसांपर्यंत विना वीजा राहू शकतात.

७. सेशेल्स
भारतीय पासपोर्ट धारक ३० दिवसांपर्यंत येथे विना वीजा राहू शकतात. हा देश सुंदर समुद्री जीवनासाठी प्रसिद्ध आहे.

८. मलेशिया
सुंदर बीचेस आणि चांगल्या फूडसाठी प्रसिद्ध या देशात भारतीय पासपोर्टधारक ९० दिवसांपर्यंत विना वीजा राहू शकतात.

९. कतार
मिडिल ईस्टमधील हा देश सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. येथे भारतीयांसाठी ३० दिवस वीजा फ्री स्टे साठी परवानगी आहे.

१०. डोमेनिका
हा १३४२ मीटर उंच ज्वालमुखी आहे, जो पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. तसेच सुंदर धबधबे येथे आहेत. भारतीय पासपोर्ट धारकांना येथे ६ महिने थांबण्यासाठी वीजाची गरज नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narhe Pune Crime News | पुणे : इस्टेट एजंटने गोळ्या झाडून संपवलं जीवन, नऱ्हे परिसरातील घटना

Pune Lok Sabha Election 2024 | वसंत मोरे यांच्यासह 33 जणांचे डिपॉझिट जप्त; जाणून घ्या

Murlidhar Mohol | राज्यातील सहकार क्षेत्रावर पकड मिळविण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ‘सहकार’ मंत्रालयाची जबाबदारी !