10 कोटी अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्सला मोठा धोका ! ‘या’ 10 VPN Apps व्दारे चोरी होऊ लागलेत ‘प्रायव्हेट’ फोटो-व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगल प्ले स्टोरवर मालवेयर अ‍ॅप्स असणे आता सामान्य बनले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येणार्‍या बातम्यांनंतर आता पुन्हा १० धोकादायक अ‍ॅप्स समोर आले आहेत. व्हीपीएन प्रो च्या संशोधकांना अशा विनामूल्य व्हीपीएन अ‍ॅप्समध्ये त्रुटी आढळल्या आहेत, जे वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) अ‍ॅप्स सुरक्षित कनेक्शनसाठी बनविलेले असले तरी तज्ज्ञांनी काही धोकादायक अ‍ॅप्सबद्दल अँड्रॉइड वापरकर्त्यांना चेतावणी दिली आहे. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांमध्ये इतके लोकप्रिय आहेत की, त्याचे वापरकर्ते १० कोटीपेक्षा जास्त आहेत.

व्हीपीएनप्रोचे संशोधक जॅन यंगरेन म्हणाले की, त्यांच्या विश्लेषणावरून दिसून आले की, या अ‍ॅप्समध्ये काही त्रुटी आहेत, ज्यामुळे वापरकर्त्याच्या फोनवर धोकादायक हल्ले होऊ शकतात. या हल्ल्याला ‘मॅन इन द मिडल (MITM)’ हॅक्स म्हटले आहे. या अनुप्रयोगांद्वारे हॅकर्स सहजपणे वापरकर्ता आणि व्हीपीएन प्रदाता दरम्यानच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा मागोवा घेऊ शकतात. तसेच, फोनमध्ये वापरकर्ता केव्हा काय करीत आहे, हे देखील हॅकर्स तपासू शकतात. व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चे कार्य वापरकर्त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी खाजगी ठेवणे आहे. परंतु हे अ‍ॅप्स उलट कार्य करीत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेशी छेडछाड करीत आहेत.

१० धोकादायक अ‍ॅप्स

  • TapVPN Free VPN
  • Best Ultimate VPN – Fastest Secure Unilimited VPN>>Korea VPN – Plugin for OpenVPN
  • Wuma VPN-PRO(Fast & Unlimited & Security)
  • VPN Unblocker Free unlimited Best Anonymous Secure
  • VPN Download : Top, Quick & Unblock Sites
  • Super VPN 2019 USA – Free VPN, Unblock Proxy VPN
  • Secure VPN-Fast VPN Free & Unlimited VPn
  • Power VPN Free VPN
  • SuperVPN Free VPN Client

खासगी गोष्टींपासून ते फोटो-व्हिडिओंपर्यंत काहीच नाही सुरक्षित
यंगारेन म्हणाले की, आमच्या संशोधनानुसार, १० कोटीहून अधिक लोकांच्या क्रेडिट कार्डचा तपशील चोरी होण्याचा धोका आहे, तसेच खासगी फोटो आणि व्हिडिओदेखील ऑनलाइन लीक किंवा विक्री होऊ शकतात. दर मिनिटास वापरकर्त्याच्या खासगी गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि गुप्त ठिकाणी पाठवल्या जाऊ शकतात. संशोधकांनी वापरकर्त्यांना फोनवरून हे अ‍ॅप्स त्वरित हटवण्याची विनंती केली. संशोधक म्हणतात की, आपल्याकडे आपल्या फोनमध्ये यापैकी १० पैकी कोणतेही अ‍ॅप्स असल्यास ते त्वरित काढून टाका.