ब्रिटेन गॉट टॅलेंट : 10 वर्षीय मुलीचं गाणं ऐकू ‘हैराण’ झाले जज, AR रहमाननं शेअर केला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्रिटेन गॉट टॅलेंटमध्ये 10 वर्षीय सोपरनिका नायरनं भाग घेतला होता. सध्या सोपरनिकाचा सिंगिंग व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सिंगर आणि कंपोजर एआर रहमानलाही सोपरनिकाचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्यांनी ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करत तिचं कौतुकही केलं आहे.

ब्रिटेन गॉट टॅलेंटच्या ऑडिशनमध्ये सोपरनिकानं द ट्रोली साँग गायलं होतं. परंतु जज सायमन कावेल यांनी तिला मध्यचे थांबवलं आणि नेव्हर इनफ हे गाणं गायला सांगितलं. त्यांना सोपरनिकाचा आवाज वेगळ्या स्केलवर चेक करायचा होता. जशी सोपरनिकानं गाणं गायला सुरुवात केली ऑडियंसनं टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

सोपरनिकाच्या सादरीकरणानंतर असं स्पष्ट दिसत होतं की, जजला तिचं गाणं खूप आवडलं आहे. तिच्या दुसऱ्या गाण्यानंतर सर्वांनीच तिला स्टँडिंग ओवेशन दिलं. तिच्या सादरीकरणानंतर जज डेविड विल्यम्स म्हणाले, “हा साँगचा पर्वत आहे जो तू जिंकला आहेस.” एवढ्यात लहान वयात तिला एनढं प्रोफेशनली गाणं गाताना पाहून जजदेखील हैराण झाले होते.