100 Bowls Of Noodles | ’भूकेल्या’ मुलीने वडीलांच्या फोनवरून ऑर्डर केले 100 बाउल्स नूडल्स (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – मुले काहीही करू शकतात, असेच काहीसे चीनमध्ये झाले. होय, येथे एका तीन वर्षाच्या बालिकेच्या हातात वडीलांचा फोन आला, तेव्हा तिने असे काही केले की वडील हैराण झाले. नूडल्सचे (100 Bowls Of Noodles) इतके बाउल्स त्यांच्या घरी पोहचले की, संपूर्ण खोली बाउलने भरली. 100 Bowls Of Noodles | hungry three year old girl orders 100 bowls of noodles viral video

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

चीनच्या जिलिनमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीने चुकीने आपल्या वडीलांच्या मोबाइल फोनवरून झा जियांग मिया (सोयाबीन पेस्टसह नूडल्स) चे 100 बाउल ऑर्डर करून मागवले.

वेबसाइट डेर्ही. ले नुसार मुलीच्या वडीलांनी सुरूवातीला विचार केला की, ऑनलाइन ऑर्डर दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने नूडल्स बाउल जिंकले आहेत, परंतु जेव्हा त्यांनी आपला मोबाइल चेक केला, तेव्हा मुलीने केलेल्या चुकीबाबत समजले.

खरं तर मुलीने एक बाउल ऑर्डर केला होता, परंतु चुकीने तिच्याकडून दोन वेळा शून्यचे बटन दाबले गेले, ज्यामुळे नूडल्सचे 100 बाउल घरी पोहचले.

जेव्हा वडीलांनी मुलीला विचारले, की नूडल्सचे इतके बाउल कशासाठी मागवले, तेव्हा मुलीने मोठ्या निष्पापपणे उत्तर दिले की तिला भूक लागली होती. मात्र, नूडल्सचे 100 बाउल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी मॅनला 13व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये 7 फेर्‍या माराव्या लागल्या.

इतके सर्व नूडल्स बाउल पाहून त्या व्यक्तीने ते बाऊल एक रूममध्ये ठेवून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला.
यासोबत त्याने लिहिले आहे की.
तो भाग्यशाली आहे त्याच्या मुलीने केवळ 100 बाउलची ऑर्डर दिली होती.

या क्लिपमध्ये मुलीच्या वडीलांनी म्हटले आहे.
जर मुलीने चारवेळा झीरो बटन दाबले असते तर नूडल्स बाउल ठेवण्यासाठी घरात जागा झाली नसती.

नंतर या मुलीच्या वडीलांनी नूडल्सचे केवळ आठ बाउल आपल्या कुटुंबासाठी ठेवून.
बाकीचे नूडल्स बाउल स्वच्छता कर्मचार्‍यांना आणि गरजूंना वाटले.
या ऑर्डरसाठी त्यांना सुमारे 15 हजार रुपये द्यावे लागले.

Web Title :- 100 Bowls Of Noodles | hungry three year old girl orders 100 bowls of noodles viral video

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर