100 Crore Recovery | ठाकरे सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाकडून झटका, HC ने दोघांच्याही याचिका फेटाळल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात सीबीआयनं (CBI) 100 कोटींच्या वसुली प्रकरणात (100 Crore Recovery) दाखल केलेला गुन्हा (FIR) रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे. सीबीआयनं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमीबर सिंह (Parmibar Singh) यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल (100 Crore Recovery) केला होता. यानंतर राज्य सरकार (State Government) आणि अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारलाही (Thackeray government) मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारला निकालावर दोन आठवडे स्थगिती हवी होती, कारण राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घ्यायची होती. परंतु हायकोर्टाने निकालास स्थगिती देण्यास नकार दिला. दुसरीकडे अनिल देशमुख यांच्याबाबत देण्यात आलेल्या निकालालाही स्थगिती देण्याची अनिल देशमुख यांच्या वकिलाची मागणी होती. सीबीआयचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती. परंतु हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

राज्य सरकारची याचिका फेटाळली

अनिल देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने त्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या,
तसेच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधल्या दोन परिच्छेदांमध्ये यासंदर्भातले उल्लेख करण्यात आला होता.
परंतु न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारसाठी देखील हा धक्का मानला जात आहे.
त्यामुळे आता याप्रकरणात सखोल चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे प्रकरण ?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते,
असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना लिहिले होते.
देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरु आहे.

Web Title :- 100 Crore Recovery | bombay high court give jolt to former home minister anil deshmukh throws petition to cancels cbi fir

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कारवाई

Pune Crime | संदीप मोहोळ खून प्रकरणात सचिन पोटेसह जमीर शेख, संतोष लांडेला जन्मठेप; गणेश मारणे, राहुल तारूसह इतरांची निर्दोष मुक्तता