शंभर कोटीच्या अमिषापोटी दीड कोटिला गंडा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली असून ते देण्यासाठी लागणारे चार्जेस भरायला पैसे पाहिजेत असे सांगून14 जणांची एक कोटी 52 लाख 27 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार केरळ, दिल्ली आणि वाकड या ठिकाणी घडला.

या प्रकरणी राकेश गंगाधर कोटोला (44, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अज्ञात महिलेने राकेश यांना फोन करून सांगितले की, त्यांचे मित्र के शिवदासन यांना शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

या लॉटरीचे पैसे राकेश यांच्या खात्यावर जमा करायचे आहेत. त्यासाठी जीएसटी, ट्रान्सफर चार्जेस, ड्युमरेज चार्जेस, कन्वर्जन चार्जेस, मनी लाँडरिंग चार्जेस, प्रोसेसिंग फी, स्टॅम्प चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस आणि हॉटेल बिल अशा विविध चार्जेसच्या नावाखाली 14 जणांनी मिळून राकेश यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर एक कोटी 52 लाख 27 हजार 400 रुपये घेतले.

सर्व प्रकारच्या चार्जेसचे पैसे देऊनही आरोपींनी लॉटरीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले नाही. तपास वाकड पोलिस करीत आहे.