home page top 1

विजेची तार पडून १०० मेंढ्या ठार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील जैतापूरमध्ये मध्यरात्री शेतात बसलेल्या मेंढ्यावर वीजेची तार पडल्याने शॉक लागून त्यात १०० हून अधिक मेंढ्याचा जागीच मृत्यु झाला.

पीक लागवडीपूर्वी शेताला खत मिळावे यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात मेंढ्यांना रात्री थांबायला जागा देतात. त्यांच्या मलमुत्रामुळे जमिनीला चांगले खत मिळत असते.

जैतापूर येथील एका शेतात मेंढ्यांचा रात्री मुक्काम होता. त्यावेळी तेथून जाणारी वीजेची तार तुटून या मेंढ्यांवर पडली. त्यात किमान १०० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेमुळे या मेंढपाळावर मोठे संकट कोसळले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

 

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’

Loading...
You might also like