कर्तृत्वाला सलाम ! 100 जवानांनी सलग 4 तास बर्फामधून चालत जावून प्रेग्नंट महिलेला पोहचवलं हॉस्पीटलमध्ये, PM मोदींनी केला व्हिडीओ ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कर आज 72 वा सैन्य दिन साजरा करीत आहे. सैन्य दिनाच्या या निमित्ताने प्रत्येकालाच देशाच्या सुरक्षेमध्ये तैनात केलेल्या सैनिकांचा अभिमान आहे. पण जवानांचा अभिमान वाटावा अशी बाब पुढे आली आहे. जम्मू कश्मीर मधील जवानांचा एक व्हिडीओ पुढे आला आहे. त्यात गुडघ्याएवढ्या बर्फातून तब्बल ४ तास वाट काढत भारतीय जवानांनी एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवले आहेत. यात जवळपास १०० जवानांचा सहभाग आहे. हा व्हिडिओ पाहता भारतीय सुरक्षा दलात तैनात केलेले सैनिक केवळ शत्रूंवर हल्ला करण्यासाठीच नव्हे तर सर्वसामान्यांना मदत करण्यासाठीही तयार असल्याचे दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा व्हिडिओ ट्विट करून सैनिकांचे कौतुक केले आहे. तसेच या महिलेला आणि तिच्या मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

सैन्याच्या चिनार कोर्प्सला मंगळवारी सांगण्यात आले होते की खोऱ्यात हिमवृष्टी झाल्यामुळे गर्भवती महिलेला रुग्णालयात पाठविण्यात अडचण येत आहे. जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे कंम्बरेपर्यंत बर्फ साठला आहे. त्यामुळे रस्ते देखील बंद झाल्याने कोणतेही साधन महिलेला रुग्णालयात पोहोचू शकले नाही. त्यानंतर १०० जवान तिथे पोहचले आणि त्यांनी जोरदार हिमवृष्टी होत असताना देखील तब्बल चार तास चालत जाऊन या महिलेला रुग्णालयात पोहचवले.

शमीमा नावाच्या या महिलेस तातडीने स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच तिने मुलाला जन्म दिला. गेल्या ३ दिवसांपासून जम्मू -काश्मीर मध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रस्ते आणि वायुमार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/