पुण्यातील १०० चौक ‘नो व्हायोलेशन झोन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी पुण्यातील १०० चौक आणि रस्त्यांवर नो व्हायोलेशन झोन तयार करण्यात आला आहे. पुणे वाहतूक शाखा, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, पीएमपीएमएल विभाग यांच्या कडून हे चौक निश्चित करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c650434-ce3d-11e8-b897-edd6dd236e3c’]

निश्चित करण्यात आलेल्या चौकामध्ये आणि रस्त्यावर शुक्रवार (दि.१९) पासून पुणे वाहतूक शाखा, महापालिका प्रादेसिक परिवहन विभाग संयुक्तपणे कारवाई करणार आहे. वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर, फुटपाथवर उभी केलेली वाहने, नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडून टेम्पो व क्रेन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

त्याचप्राणे वाहने व पादचाऱ्यांची सर्वाधिक गर्दी असलेल्या ठिकाणांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त होणार आहेत. त्यामुळे वाहतुक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच या झोनमध्ये वाहतुकीस अडथळा होणाऱ्या रोडवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. तर झेब्रा स्टॉपलाईन पट्टे रंगविणे, विद्युत पोल स्थलांतरीत करणे, सिग्नलला अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे इत्यादी कामांची पुर्तता करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’425edce9-ce3d-11e8-92f1-531b2aeea62b’]

पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न करण्यात येत असतात. वाहन चालकांकडून नियमभंग केल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात. वाहन चालकांना शिस्त लागावी अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या करिता वाहतूक शाखेकडून वेळोवेळी विशेष मोहिब राबवण्यात येत असते. या द्वारे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. तरी वाहन चालकांनी नियमांचे पालन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.