राज्यात प्राध्यापक, कर्मचार्‍यांसाठी 100 % उपस्थितीचा निर्णय मागे

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अंतिम वर्ष परीक्षेच्या कामकाजासाठी प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांसाठी 100 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. संंबंधितांना आवश्यकतेनुसार ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाही अंतिम वर्षांची परीक्षेची तयारी आणि निकालाच्या कामासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची महाविद्यालयांतील उपस्थिती 100 टक्के असावी असा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला प्राध्यापक संघटनांनी विरोध करीत आंदोलन केले होते. त्यामुळे अखेर शासनाने 100 टक्के उपस्थितीचा निर्णय मागे घेतला आहे. परीक्षेच्या कामाशी संबंधित प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहता येईल. परीक्षा किंवा परीक्षेशी संबंधित कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून विद्यापीठ किंवा महाविद्यालयांनी उपस्थितीसंदर्भात गरजेनुसार निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like