गांधी जयंतीनिमित्त राज्यातील 100 कैद्यांची सुटका होणार

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १०० कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे . यात नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून सर्वाधिक कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

येत्या 5 ऑक्टोबरला या सर्व कैद्यांची सुटका केली जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ मध्यवर्ती कारागृह तसेच वर्धा आणि धुळे कारागृह अशा एकूण 11 कारागृहांतून 100 कैदांची सुटका केली जाणार आहे. तळोजा कारागृहातून 37 कैदी, येरवडा कारागृहामधून 24 कैदी, नाशिक कारागृहामधून 10 आणि इतर कारागृहातील प्रत्येकी एक-दोन कैद्यांना सुटकेमुळे दिलासा मिळणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e02d82a3-c612-11e8-bdbb-a3cc2adc4d2e’]

कोणत्या कैद्यांची होणार सुटका

– ज्या कैद्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत
– ज्या कैद्याचे वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्याची 50 टक्के शिक्षा पूर्ण झालेली असावी
– ज्या कैदाचे वय 55 पेक्षा कमी असेल त्याने 66 टक्के शिक्षा पूर्ण झालेली असावी
– महिला आणि ज्यांना अपंगत्व किंवा फिजिकल चॅलेंज आहेत, अशांची शिक्षा देखील 50 टक्के पूर्ण झालेली असावी

[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef3e5239-c612-11e8-a51c-75e12e615429′]

कुणाची सुटका होणार नाही

– ज्या कैद्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत
– ज्या कैद्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्या कैद्यांची सुटका होणार नाही
– टाडा, मनी लॉन्ड्रिंग, ब्लॅक मनी तसेच भ्रष्टाचार अॅक्टनुसार कैद असलेल्या कैद्यांची सुटका होणार नाही.

[amazon_link asins=’B01MCUSD3L,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e31851b5-c613-11e8-ae4d-4f6d57a7aaf9′]

जाहिरात