गृह मंत्रालायातून १००० अधिकाऱ्यांना काढलं, तब्बल ८६ ‘भ्रष्ट’ IAS, IPS आणि IRS वर ‘कारवाई’ सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहिम उघडली आहे. गृह मंत्रालयने भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि अयोग्य वर्तन असलेल्या एक हजार अधिकाऱ्यांना पाच वर्षात घरचा रस्ता दाखवला आहे. तर आता ८६ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयने भ्रष्टाचार विरोधात तपासणी सुरु केली आहे. ही माहिती सरकारने लोकसभेत दिली.

बीजद खासदार भर्तुहरि महताब आणि भाजप खासदार संगीता कुमारी सिंह देव यांनी लोकसभेत विचारले की, पंतप्रधानांनी सांगावे की मागील तीन वर्षात कितीही आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई केली. तसेच किती अधिकारी अवैध पद्धतीने संपत्ती जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आणि किती जण आपल्याविरोधात तपास सुरु झाल्याने परदेशात पळले?

लोकसभेत PMO चे राज्य मंत्री डॉ. जितेंंद्र सिंहने सांगितले की, सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एकूण ८६ आयएएस, आयपीेएस आणि आयआरएस विरोधात मागील तीन वर्षात कारवाई केली. ही कारवाई २०१६, २०१७, २०१८ आणि २०१९ या दरम्यान झाल्या. सरकारने ३० जून २०१९ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईंची माहिती देताना सांगितले की, ३ वर्षांत २६ आयएएस, आयपीएस, आयआरएस च्या विरोधात आरोप स्पष्ट झाले.

असे असले तरी अजूनही कोणताही अधिकारी परदेशात पळालेला नाही. मंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात शून्य सहिष्णुता चे धोरण स्विकारले आहे. मागील ५ वर्षात १०८३ अधिकाऱ्यांना सेवेतून काढण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांविरोधात परफॉर्मेंस, चारित्र्य, भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सरकारने कारवाई केली आहे.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like