सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा ‘या’ 101 Tips

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपलं सौंदर्य उजळावं, आपण सुंदर दिसावं असे प्रत्येकाला वाटतं. विशेषत: महिला या बाबतीत खुप काळजी घेत असतात. यासाठी त्या नियमित पार्लरमध्ये जातात. पण सौंदर्य वाढवायचे असेल तर केवळ पार्लरमध्ये जाणे हाच एकमेव पर्याय नाही. याच्यासोबत घरात काही टीप्स नियमितपणे फॉलो केल्या तर तुमचे सौंदर्य नक्कीच खुलून येईल. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक ठरते. अशाच 101 टीप्स आपण जाणून घेणार आहोत, ज्या काटेकोरपणे पाळल्यास तुमची त्वचा नक्की सुंदर होईल.

सुंदर त्वचेसाठी 101 टीप्स

सतत फोन वापरल्याने त्वचा खराब होऊ शकते. फोन स्वच्छ केल्याशिवाय कानाला लावू नका.
काहीही खाताना किंवा पिताना चेहर्‍याला हात लावू नका. तेलकट हात, मसाला त्वचेला त्रासदायक ठरु शकतो.

1)  त्वचा चांगली हवी असेल तर पोटात चांगले अन्न जाणे आवश्यक.
2)  लिंबू वर्गातील सगळी फळे खा.
3)  चेहर्‍याला काही नैसर्गिक लावायचे असेल तर फळांचे रस लावा.
4)  कोंडा झाला असेल आधी त्याचा इलाज करा.
5)  कोंड्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.
6)  कोंड्यामुळे अन्य त्रास ही होऊ शकतो.
7)  त्वचेसाठी पोटाचे आरोग्यही महत्वाचे.
8)  पाट साफ होत नसेल तिकडे लक्ष देणे गरजेचे.
9)  पोट साफ होण्यासाठी काढा अथवा साफी हमखास घेऊ शकता.
10)  त्वचा उजळण्यासाठी जर काही लावत असाल तर ते टाळा.
11)  प्रत्येकाच्या त्वचेचा रंग हा वेगळा असतो. त्वचा चांगली करु शकता.
12)  गोर्‍या रंगाच्या हव्यासापेक्षा त्वचा चांगली ठेवणे आवश्यक.
13)  जर 12 ते 15 तास काम करत असाल तर या दरम्यान चेहरा एकदा तरी स्वच्छ धुवा.
14)  पिंपल्स असतील तर काही दिवस त्वचेची काळजी घ्या.
15)  चेहर्‍याला कोणत्याही प्रकारे अस्वच्छ हात लावू नका.
16)  चेहर्‍याला तेलाने मसाज करायचा असल्यास व्हिटॅमिन ए किंवा बदामाच्या तेलाचा वापर करा.
17)  डोळ्यांचा मेकअप घालवण्याचा त्रास होत असेल तर डोळ्यांचा मेकअप टाळा.
18)  लिपस्टिक ओठांवर नसली तरी ती पूर्णपणे काढणे आवश्यक असते.
19)  चेहर्‍यावर ब्लीच करत असाल तर आधी योग्य सल्ला घ्या.
20)  स्वस्तातले ब्लीच वापरू नका. त्रास होऊ शकतो.
21)  ब्लीच चेहर्‍यावर साधारण 7 ते 10 मिनिटांसाठी ठेवावे.
22)  ब्लीचचे कॉस्मेटिक्स केसांना हायलाईट करायला थेट वापरु नका.
23)  ब्लीच करताना मानेला देखील लावा.
24)  ब्लीचचा उपयोग अनेकदा अंडरआर्म्समध्येही केला जातो. सल्ल्याशिवाय येथे थेट वापर करु नका.
24)  नाकावर सतत घाम येण्याने पुळ्या येऊ शकतात. अशा पुळ्यांवर योग्य इलाज करा.
25)  त्वचेवर वांग असल्यास योग्यवेळी इलाज करा.
26)  अशांवर घरगुती इलाज नेहमीच काम करु शकत नाही.
27)  क्लिनिंग, टोनिंग, मॉश्चरायझिंग चेहर्‍यासाठी आवश्यक.
28)  गुलाबपाण्याचा उपयोग नॅचरल टोनर म्हणून करा.
29)  रोज रात्री चहर्‍याला बर्फ देखील लावू शकता त्यामुळे पोअर्स बंद होतील.
30)  अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचेही भरपूर फायदे आहेत त्याचा उपयोग करु शकता.
31)  सनटॅनसाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करु शकता.
32)  सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घालून प्या. पिंपल्स कमी होतील.
33)  पचनसंस्था सुधारल्यामुळे लाभ होऊ शकतो.
34)  फार मेकअप करुन घराबाहेर जायचे नसेल तर चेहर्‍याला बेबी पावडर लावू शकता.
35)  बेबी पावडरचे कोणतेही साईड इफेक्टस नसतात.
36)  अ‍ॅलोवेरा जेल चेहर्‍याला तजेला आणू शकते.
37)  अ‍ॅलोवेरा जेलमुळे त्वचेला आवश्यक गोष्टी मिळतात.
38)  इन्स्टंट फ्रेश होण्यासाठी काकडीचा रस चेहर्‍याला लावा.
39)  पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस चेहर्‍याला लावा.
40)  कोथिंबीर आणि ओट्स यांचा पॅकही चेहर्‍याला लावू शकता. इन्स्टंट उजळपणा येईल.
41)  कोणतेही ब्युटी प्रोडक्ट एका दिवसात कोणताही चमत्कार दाखवू शकत नाही.
42)  पिंपल्स एका दिवसात जाऊ शकत नाही. त्यामुळे थोडी वाट नक्की पाहा.
42)  चांगल्या त्वचेसाठी भरपूर पाणी प्या.
43)  चेहर्‍याला काहीही लावण्याआधी चेहर्‍याचा प्रकार ओळखा.
44)  गरम पाण्याने चेहरा धूत असाल तर पोअर्स उघडे राहण्याची शक्यता अधिक असते अशावेळी 45)  चेहर्‍याला बर्फ लावायला विसरु नका.
46)  आठवड्यातून दोन वेळा तरी चेहरा स्क्रब करा.
47)  त्वचा नाजूक असल्यास चेहर्‍याला त्रास देणारे स्क्रब वापरु नका.
48)  उन्हात जाताना सनस्क्रिन लावूनच बाहेर पडा.
49)  सनस्क्रिनची निवडही त्वचेच्या प्रकारानुसार करा.
50)  सनस्क्रिन निवडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
51)  चेहरा मऊ, मुलायम राहण्यासाठी मॉश्चरायझर लावा.
52)  कामाच्या वेळा आणि तुमचे कामाचे स्वरुप यांचा विचार करुन मॉश्चरायझर निवडा.
53)  पंचवीस वयोगटाच्या पुढील असल्यास चेहर्‍याला मसाज आवश्यक आहे.
54)  फेस मसाज पार्लरमध्ये करुन घ्यायची इच्छा नसेल तर योग्यपद्धतीने तो करायला शिका.
55)  फेसमसाज करताना कोणतेही तेल चेहर्‍याला लावू नका.
56)  अगदी काहीही न लावता चेहर्‍याला मसाज करु शकता.
57)  व्हिटॅमिन ए, बदामाचे तेल चेहर्‍यासाठी चांगले असते.
58)  चेहर्‍यासाठी फेशिअल सुद्धा महत्वाचे असते. त्यामुळे महिन्यातून एक तरी साधे फेशिअल नक्की करुन पाहा.
59)  प्रोफेशनल ठिकाणी मेकअप करुन घेणे उत्तम. यामुळे त्वचा चांगली राहते.
60)  त्वचेवर सतत प्रयोग करणे टाळा.
61)  त्वचेवर मुरुम असतील तर आधी डॉक्टरांना दाखवा.
62)  पिंपल्स कधीही फोडू नका. त्यामुळे चेहरा काळवंडू शकतो.
63)  पिरेड्स येण्याआधी येणारे पिंपल्स अगदी सर्वसाधारण असतात. घाबरुन नका.
64)  पिंपल्सवर कोणतेही जालीम उपाय करुन पाहू नका.
65)  चेहर्‍यावर केस असतील तर ते काढण्यासाठी चेहर्‍यावर रेझर फिरवू नका.
66)  वॅक्स करणे चेहर्‍यासाठी चांगले नाही.
67)  कोणताही मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी योग्य क्लिनझरचा वापर करा.
68)  मेकअप काढताना चेहरा घासू नका.
69)  डोळ्यांचा मेकअप काढणे हे थोडे कठीण जात असेल तर तो तेलाने काढा
70)  त्वचेला खोबरेल तेलाचा किंवा इतर तेलाचा त्रास असेल तर वापर टाळा.
71)  त्वचा फारच नाजूक असेल तर बेबी वाईप्स वापरला.
72)  त्वचा ऑईली असल्यास ऑईलबेस मेकअप प्रोडक्ट अजिबात वापरु नका.
73)  चेहर्‍याला थेट मेकअप लावण्याआधी चेहर्‍याला पोअर्स बंद करणारे प्राईमर नक्की लावा. 74)  म्हणजे मेकअप थेट तुमच्या पोअर्समध्ये जाणार नाही.
75)  मेकअप काढल्यानंतर चेहरा स्वच्छ करायचा असेल तर गरम पाण्याने चेहरा धुवू शकता.
76)  गरम पाण्याने चेहर्‍याला वाफ घेतली तरी चालू शकेल.
77)  त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल.
78)  मेकअप काढल्यानंतर चेहर्‍याला मॉश्चरायझर लावा.
79)  रात्री झोपताना मेकअप काढून मगच झोपा.
80)  सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
81)  साबणाचा वापर चेहर्‍यावर करणे टाळा.
82)  तुमच्या चेहर्‍याला शोभेल असा फेसवॉश तुमच्या चेहर्‍याला लावा.
83)  दिवसातून केवळ दोनच वेळ तुमचा चेहरा फेसवॉशने धुवा.
84)  जास्त वेळ फेसवॉशचा वापर करणे चांगले नसते.
85)  जर चेहर्‍याला उत्तम फेस ट्रिटमेंटची गरज असेल तर ती घ्या.
86)  त्वचेच्या डॉक्टरांना तुमचा चेहरा आवर्जून दाखवा.
87)  त्वचेला आवश्यक असलेल्या सप्लीमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यास काहीच हरकत नसते.
88)  चेहर्‍याला कधीही दुसर्‍या व्यक्तीने वापरलेला टॉवेल लावू नका.
89)  दुसर्‍यांचा टॉवेल वापरल्यामुळे चेहर्‍याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
90)  शक्य असल्यास त्वचेसाठी टर्किश टॉवेलचा वापर करा.
91)  चेहर्‍यासाठी टिश्यूपेपरचा वापर करत असाल तर पातळ टिश्यू वापरा.
92)  सुंदर त्वचेसाठी व्यायामही तितकाच महत्वाचा असतो.
93)  चेहर्‍यावरील रक्तपुरवठा चांगला ठेवण्यासाठी तुम्ही काही व्यायाम हमखास करुन पाहायला हवे.
94)  कोणत्याही गोष्टी चेहर्‍यावर लावण्याआधी त्वचेचा प्रकार ओळखून घ्या.
95)  त्वचेच्या नाक, हनुवटी, कपाळावर तेल साचत असेल तर त्वचा ऑईली आहे.
96)  त्वचेला चटकन काहीही त्रास होत असेल तर त्वचा नाजूक आहे.
97)  त्वचा अगदी काहीही न करता कोरडी पडत असेल तर त्वचा कोरडी आहे.
98)  प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी वेगवेगळे स्किन प्रोडक्ट असतात.
99)  त्वचेच्या प्रकारानुसार त्यांचा वापर करु शकता.
100)  थोडी वाट नक्की पाहा.
101) महिन्यातून एकदा तरी फेसमसाज करा.