१०२ वर्षांच्या आजींनी केला ‘हा’ कारनामा ! 

ऑस्ट्रेलिया :वृत्तसंस्था – ‘स्कायडायव्हींग’ हा साहसी  खेळ सगळ्यांनाच आवडतो  पण प्रत्येकालाच ते जमेल असे नाही. कारण ते करण्यासाठी खूप धाडस लागत. असाचं  काही धाडसी  कारनामा ऑस्ट्रेलियातील १०२ वर्षाच्या आज्जींनी केला आहे .आजीबाईंच्या या धाडसामुळे हे परत सिद्ध झाले की इच्छा असेल तर काही तुमच्या आड येत नाही अगदी वय आणि भीती सुद्धा.अनेक वृद्धही असं काही काम करतात  की तरुण ही त्यामुळे मागे राहतात.

इरेना ओशिया असे या आजींचे नाव आहे. हा साहसी कारनामा करुन  त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. त्यामुळे आजीबाई सोशल मीडियावर  चांगल्याच चर्चेत आहेत. इरेना या आता अधिकृतपणे जगातल्या पहिल्या सर्वात वृद्ध स्कायडायवर झाल्या आहेत. त्यांनी आपल्या परिवाराच्या आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत स्कायडायव्हींग केलं आणि साऊथ ऑस्ट्रेलियाच्या मोटर डिजीज असोसिएशनसाठी धनराशीही जमवली. रिपोर्ट्सनुसार, इरेनाने हे स्कायडायव्हींग तिच्या मुलीला डेडिकेट केलं. कारण त्यांच्या मुलीचा १० वर्षांआधी मोटर न्यूरॉन डिजीजने मृत्यू झाला होता.

१०२ वर्षांच्या इरेना यांचं हे पहिलंच स्कायडायव्हींग नव्हतं. याआधी २०१७ मध्येही त्या सर्वात वृद्ध स्कायडायवर ठरल्या होत्या. त्यांनी गेल्या रविवारी पुन्हा एकदा आपलाच रेकॉर्ड तोडला. इरेना यांनी  २०१६ मध्ये स्कायडायव्हिंगच्या माध्यमातून चॅरिटीसाठी१२ हजार डॉलर (८. ५लाख रूपये) गोळा केले होते. त्यांनी या उडीद्वारे देखील १० हजार डॉलर (७. २ लाख रूपये) गोळा करण्याचे लक्ष ठेवले होते.