पाकिस्तानमध्ये 102 वर्षे जुनी ‘कपूर हवेली’ ! आता दिसते ‘अशी’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील महान अभिनेते ऋषी कपूर यांचं काल (गुरुवार दि 30 एप्रिल) निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेमा जगताला मोठा धक्का बसला आहे. ऋषी कपूर यांनी अशा कुटुंबात जन्म घेतला होता ज्यांच्या रक्तात अभिनय होता. त्यांचा एक वारसा पाकिस्तानच्या पेशावर शहरात आहे. त्याचं नाव आहे कपूर हवेली. त्याचाच इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय सिनेमातील शोमॅन म्हणवले जाणारे पृथ्वीराज कपूर यांचा जन्मा पाकिस्तानात बनलेल्या परंपरागत हवेलीत झाला होता. याच हवेलीला कपूर हवेली म्हणून ओळखलं जातं. ही हवेली पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजारात आहे. ऋषी यांचे वडिल राज कपूर यांचाही जन्म इथंच झाला होता.

2018 साली ऋषी यांनी आपली परंपरागत हवेली म्युझियममध्ये बदण्यासाठी पाकिस्तान सरकारला विनंती केली होती. यानंतर पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी त्यांची विनंती स्विकर केली होती.

कपूर हवेलीची निर्मिती 1918 ते 1922 दरम्यान दीवान बशेश्वरनाथ यांनी केली होती. ते ऋषी कपूरचे आजोबा पृथ्वीराज कपूरचे वडिल होते. यानंतर या हवेलीला कपूर हवेली म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

जेव्हा भारतात आलं कपूर कुटुंब

1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली तेव्हा कपूर खानदान पाकिस्तानातून भारतात आलं होतं. यानंतर त्यांनी सिनेमात काम करयाला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की, याच हवेलीत ऋषीचे वडिल आणि शोमॅन राज कपूर यांचा 1924 मध्ये जन्म झाला होता.

2016 साली ऋषी यांनी हवेलीबद्दल एक ट्विट केलं होतं ज्यात ते आणि रणधीर कपूर दिसत होते. त्यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांचं स्वागत केलं.

image.png
पाकिस्तानातील आपली वंशपरंपरागत जमीन पाहण्याची इच्छा ऋषी कपूर यांनी 2017 साली व्यक्त केली होती. ट्विट करत त्यानी म्हटलं होतं की, “मरण्याआधी मला एकदा पाकिस्तान पहायचं आहे.” जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पीओकेबद्दल एक विधान केलं होतं तेव्हा ऋषी यांनी हे स्टेटमेंट केलं होतं.

image.png

20 वर्षांपूर्वी य हवेलीचे वरील 3 मजेल ध्वस्त करण्यात आले होते. कारण भुकंपामुळं वरच्या भागाला तडे गेले होते. आज ही इमारत व्यावसायिक भवनांनी घेरली गेली आहे. एका रिपोर्टनुसार, यातील 60 खोल्या अद्यापही आहेत. बॉलिवूड आयकॉन दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घरही किस्सा ख्वानी बाजारमध्ये आहे जिथं ही कपूर हवेली आहे.