Coronavirus : पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी नवे 104 रुग्ण, शुक्रवारी चौघांचा मृत्यु, जिल्ह्याची संख्या 1094

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात सलग दुसर्‍या दिवशी नवीन १०४ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ९८० पर्यंत पोहचली आहे. गेली दोन दिवस शहरात शंभराहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहे. जिल्ह्यात आता एकूण १ हजार ९४ कोरोना बाधित झाले आहे.  शुक्रवारी दिवस भरात आणखी ४ जणांचा मृत्यु झाला असून शहरातील आतापर्यंत ६४ जणांचा बळी गेला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अतिसंक्रमित क्षेत्रात कडक निर्बंध घालण्यात आले होते. शुक्रवारी हे निर्बंध शिथिल करण्यात आले. या दोन दिवसात अधिकाधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्याही नित्याने वाढत आहे. शुक्रवारी १६ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आता कोरोनातून मुक्त झालेल्यांची पुणे शहरातील संख्या १४६ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांची संख्या ८१ वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात ५९ कोरोना बाधित रुग्ण आहेत.